- जाहिरात -spot_img
breaking news

तुझा ब्लाउज काढ…; कास्टिंग काउचचा अभिनेत्रीने सांगितला अनुभव 

मुंबई / नगर सह्याद्री –
कास्टिंग काउच ही इंडस्ट्रीतील काळी बाजू आहे. आजवर अनेक अभिनेत्रींनी त्यांच्यासोबत घडलेले भयंकर कास्टिंग काउचच्या घटना सांगितल्या आहेत. आताही अशाच एका प्रसिद्ध अभिनेत्रीने आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला आहे. अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मुस्कान वर्ष्णेयचा नुकताच ‘जीना दिल से’ हा हिंदी चित्रपट रिलीज झाला. तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.

मुस्कान वर्ष्णेयने तिच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल आणि कास्टिंग काउचबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे. एका मुलाखतीत मुस्कानने तिच्यासोबत घडलेला कास्टिंग काउचची घटना सांगितली. अभिनेत्री म्हणाली, “मी खूप नशीबवान आहे की, कोणीही मला कधीही थेटपणे वाईट किंवा अपमानकारक काहीही म्हटले नाही. मात्र, मला काही विचित्र मागणी आल्या आहेत. मी फक्त १६ वर्षांची होते. संगीत क्षेत्रातील एका प्रसिद्ध व्यक्तीने माझ्याशी थेट संपर्क साधला. त्यांनी मला सांगितलं की त्यांना माझ्यासोबत एक म्युझिक व्हिडिओ शूट करायचा आहे, वगैरे. मी त्या व्यक्तीचं काम बघत मोठी झाले होते, त्यामुळे मला वाटलं, ‘व्वा, ही खूप चांगली संधी आहे… मग तो म्हणाला, ‘तुम्ही गाझियाबादमध्ये राहता आणि मी दुसऱ्या शहरात, त्यामुळे फक्त एका ऑडिशनसाठी इथपर्यंत प्रवास करणे तुमच्यासाठी खूप थकवणारा असेल, त्यामुळे आपण व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलवर ऑडिशन घेऊया.” पुढे अभिनेत्री म्हणाली,” तेव्हा व्हिडिओ कॉल ऑडिशन सुरू झाले. ते म्हणाले, “आम्हाला तुम्हाला पारंपरिक कपड्यांमध्ये पाहायचं आहे.

सूट, साडी, किंवा असं काहीतरी…” म्हणून मी एक सूट घालून पाहिला आणि मग ते म्हणाले, “ठीक आहे, आता तुम्ही साडीमध्ये कशा दिसता ते आम्हाला दाखवा…” इथपर्यंत सगळं काही अगदी सामान्य आणि नेहमीचं वाटत होतं… विशेषतः मी अजूनपर्यंत इन्स्टाग्रामवर सूट किंवा साडीमध्ये कोणतेही फोटो पोस्ट केले नसल्यामुळे, मला वाटलं की त्यांना फक्त मी त्यात कशी दिसते हेच पाहायचे आहे. एकदा मी साडी नेसल्यावर, त्यांनी मला नेहमीच्या पोझेस द्यायला सांगितल्या… आम्हाला तुमची उजवी बाजू दाखवा, डावी बाजू, आता समोरून, वगैरे…” अनुभव सांगताना शेवटी अभिनेत्री म्हणाली, “त्यापुढे ते बोले, ‘ठीक आहे,आता तुमचा ब्लाउज काढा…’ मी थक्क झाले… हा माणूस बॉलिवूडमधील एक मोठा सेलिब्रिटी आहे. व्हिडिओ कॉलवर त्याची संपूर्ण टीम नव्हती; तो एकटाच होता. म्हणून मी विचारलं, ‘का? मला माझा ब्लाउज काढायची काय गरज आहे?’ आणि तो म्हणाला, ‘नाही, नाही! मला फक्त बघायचं आहे की त्यामुळे कसा ‘ऑफ-शोल्डर’ लुक येतो.’ ‘तुम्हाला काहीही दाखवण्याची गरज नाही; तुम्ही तुमचा पदर तसाच ठेवू शकता. मला फक्त तो लुक द्या. तो एकंदरीत फील…तेव्हा मी म्हणाले, ‘थांबा मी जाऊन ऑफ-शोल्डर ब्लाउज घालू का? तुम्हाला खरंच तेच बघायचं आहे का?’ तेव्हा तो थोडा अस्वस्थ झाला आणि मग म्हणाला, ‘ठीक आहे, ठीक आहे, मला दुसऱ्या कॉलवर जायचं आहे…असं बोलून व्हिडिओ कॉल बंद केला…”

हे सुद्धा वाचा :  रश्मिका मंदानाच्या प्रायव्हेट चॅट्स लीक; आईच्या ऑडिओ क्लिपमुळे वाद, अभिनेत्रीची कायदेशीर कारवाईची चेतावणी
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ