- जाहिरात -spot_img
breaking news

शेतकऱ्यांना दिलासा; यंदा देशात मुसळधार पाऊस, भेंडवळच्या घटमांडणीचा अंदाज जाहीर

बुलडाणा / नगर सह्याद्री –
बुलडाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध भेंडवळ भाकीत यंदासाठी जाहीर करण्यात आले आहे. या भाकीतानुसार शेती पिके सर्वसाधारण राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र, अवकाळी पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे संकेत देण्यात आले आहेत. तसेच देशाच्या राजकीय पातळीवर सध्याचे नेतृत्व कायम राहील, परंतु तणावपूर्ण परिस्थिती राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

संरक्षण खात्यावर ताण वाढून सीमावर्ती भागात सुरक्षा स्थिती तणावपूर्ण राहू शकते, असा इशाराही या भाकीतातून देण्यात आला आहे. यासोबतच देशाची आर्थिक परिस्थिती काहीशी ढासळलेली राहील, असेही नमूद करण्यात आले आहे. शेती क्षेत्रात पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

यंदा कापूस, तांदूळ पिकाचे जास्त उत्पन्न होईल. ज्वारी, तूर, मुग, उडीद, मटकी, जवस आणि वाटाणा पिकांचे सर्वसाधारण उत्पन्न होईल. तीळ, बाजरी हे पीक देखील भरपूर प्रमाणात येईल. यंदा जूनमध्ये भरपूर पाऊस असेल. जुलै सर्वसाधाण आणि ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत पावसाचा जोर कमी होईल. अनेग भागांमध्ये महापुरामुळे नुकसान होईल, असा अंदाज भेंडवळ घटमांडणीतून व्यक्त करण्यात आला आहे.

दरम्यान, भेंडवळच्या घटमांडणीची परंपरा ३७० वर्षे जुनी आहे. ही परंपरा आजही कायम आहे. अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर सूर्यास्ताच्या वेळी घटमांडणी केली जाते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योद्यावेळी घटमांडणीचे निरीक्षण सांगितले जाते. राज्यातील हवामान, पाऊस, राजकीय स्थिती, आर्थिक स्थिती, देशावरील संकट, महापूर, दुष्काळ यासर्व स्थितीचा अंदाज वर्तवला जातो. या भेंडवळाचा अंदाज ऐकण्यासाठी बुलडाण्यासह विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्यप्रदेशसह अनेक ठिकाणचे शेतकरी हजेरी लावतात.

पिकांवर रोगराईचे प्रमाण जास्त असेल
भेंडवळच्या घटमांडणीनुसार, यंदाच्या वर्षी पिकांवर रोगराईचे प्रमाण जास्त असेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच कापूस आणि तांदूळ यासह तीळ, बाजरी या पिकाचं उत्पादन यंदा भरपूर होईल, तर ज्वारी, तूर, मुग, उडीद, मटकी, जवस आणि वाटाणा पिक सर्वसाधारण होईल.

हे सुद्धा वाचा :  रुपाली चाकणकर फरार… ; रुपाली पाटील ठोंबरेंची खळबळ उडवून देणारी पोस्ट

जूनमध्ये भरपूर पाऊस, महापुरामुळे नुकसान
भेंडवळ घटमांडणीच्या अंदाजानुसार, यंदा जूनमध्ये भरपूर पाऊस पडेल. त्यानंतर जुलैमध्ये सर्वसाधाण आणि ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत पावसाचा जोर कमी होईल. मात्र अनेक भागांमध्ये महापुरामुळे नुकसान होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

संरक्षण स्थिती तणावात, आर्थिक स्थिती प्रतिकूल
तसेच देशाच्या संरक्षण आणि राजकीय स्थितीबाबतही भाकीत करताना यंदाच्या वर्षी संरक्षण स्थिती तणावात असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तसेच देशाच्या राजकीय पातळीवर सध्याचे नेतृत्व कायम राहील, मात्र तणावपूर्ण परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. याशिवाय आर्थिक स्थिती प्रतिकूल राहील, असा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.

भेंडवळच्या घटमांडणीचा अंदाज कसा बांधतात?
‘भेंडवळची घट मांडणी’ ही बुलढाण्यातील भेंडवळ गावातील स्थानिक परंपरा आहे. त्यातून ते पावसाचा अंदाज वर्तवतात असा त्यांचा दावा आहे. स्थानिकांचा त्यावर विश्वास आहे. भेंडवळच्या घटमांडणीच्या आधारावर देशातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, हवामानाचे भविष्य सांगितले जाते. वर्षभराचं भविष्य सांगण्यासाठी भेंडवळच्या घटमांडणीची परंपरेनुसार एक विशिष्ट पद्धत आहे. शेतात मध्यभागी खोल खड्डा करून त्या खड्ड्यात मातीचा घट मांडण्यात येतो. घटात चार मातीची ढेकळे, त्यावर पाण्याने भरलेली घागर आणि घागरीवर पापड, भजा, वडा, सांडोई, कुरडई ठेऊन घटाच्या बाजूला पान सुपारीसह विविध 18 प्रकारची धान्ये मांडली जातात.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ