गुलमोहर रोड रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
अहिल्यानगर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यांचे जाळे निर्माण होत असल्यामुळे उपनगरांमध्ये नागरिक वास्तव्यासाठी आकर्षित होत आहेत. नियोजनबद्ध आणि कायमस्वरूपी विकासकामांमुळे विकसित शहराची निर्मिती होत आहे. गुलमोहर रोड हा शहरातील प्रमुख रेसिडेन्सी परिसर म्हणून ओळखला जात असून येथील नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विकासकामे प्राधान्याने केली जात आहेत. शहर आता विकासकामांच्या माध्यमातून वेगाने बदलत असून विकासाची घोडदौड सुरू झाली आहे. असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
गुलमोहर रोड रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महापौर ज्योतिताई गाडे, माजी उपमहापौर गणेश भोसले, भाजप शहराध्यक्ष अनिल मोहिते, मनपा महिला बालकल्याण समिती उपसभापती वर्षाताई सानप, नगरसेविका गौरी बोरकर, माजी नगरसेवक अजिंय बोरकर, महेंद्र भैय्या गंधे, नगरसेवक निखिल वारे, प्रा. माणिक विधाते, नगरसेविका सोनाबाई शिंदे, अमोल गाडे, नगरसेवक कुमारसिंह वाकळे, सुरेश बनसोडे, अशोक गायकवाड, कुमार नवले, सुनील त्रिंबके, भाजप शहर जिल्हाध्यक्ष प्रियाताई जानवे, नगरसेवक महेश तवले, रेवणनाथ पवार, प्रकाश भागानगरे, शिवाजी डोके, नगरसेवक मनोज दुल्लम, करण कराळे, पुष्कर कुलकर्णी, सुमित कुलकर्णी, महेश लोंढे, सुशांत जाधव, अनिल ढवण आदींसह प्रभागातील अन्य नागरिक उपस्थित होते.
आमदार संग्राम जगताप पुढे म्हणाले की, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते नुकतेच गुलमोहर रोडवरील पथदिव्यांचे लोकार्पण करण्यात आले. आता रस्ता डांबरीकरणाच्या कामालाही सुरुवात झाली आहे. शहरातील डीपी रस्त्यांसोबतच कॉलनी अंतर्गत रस्त्यांची कामेही मोठ्या प्रमाणात मार्गी लागत आहेत. त्यामुळे संपूर्ण शहरामध्ये आधुनिक आणि दर्जेदार रस्त्यांचे जाळे निर्माण होत आहे.महापौर ज्योतिताई गाडे म्हणाल्या की, सावेडी उपनगरातील गुलमोहर रोड हा शहरातील विविध भागांना जोडणारा महत्त्वाचा मुख्य रस्ता आहे.
या भागात मोठ्या संख्येने नागरिक वास्तव्यास असून त्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून विविध विकासकामे केली जात आहेत. आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून शहर विकासासाठी राज्य शासनाकडून मोठा निधी उपलब्ध झाल्यामुळेच विकासकामांना वेग आला आहे. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर गुलमोहर रोड परिसराला सुशोभित आणि आकर्षक स्वरूप प्राप्त होईल.माजी नगरसेवक अजिंय बोरकर म्हणाले की, गुलमोहर रोडचे काम मार्गी लागावे यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी विशेष निधी उपलब्ध करून दिला. तसेच पथदिव्यांची कामेही पूर्ण करण्यात आली आहेत. प्रभाग क्रमांक तीनमध्ये मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाल्यामुळेच विविध विकासकामे प्रत्यक्षात साकारत आहेत.










