- जाहिरात -spot_img
breaking news

टाकळी ढोकेश्वर, भाळवणीतील अवैध दारू विक्री करणाऱ्या ७ हॉटेल्सवर पोलिसांचा छापा; मोठा मुद्देमाल जप्त

टाकळी ढोकेश्वर, भाळवणीतील अवैध दारू विक्री करणाऱ्या ७ हॉटेल्सवर पोलिसांचा छापा; मोठा मुद्देमाल जप्त

७ जण ताब्यात; पोलीस पथकाची कारवाई; आरोपींसह मुद्देमाल पारनेर पोलिसांच्या ताब्यात

पारनेर / नगर सह्याद्री :
पारनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीत बेकायदेशीरपणे देशी व विदेशी कंपन्यांच्या दारूची विक्री करणाऱ्या हॉटेल्सवर एमआयडीसी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. वेगवेगळ्या ७ ठिकाणी एकाच वेळी टाकलेल्या छाप्यांमध्ये पोलिसांनी एकूण ८३,४९० रुपये किमतीचा अवैध दारू साठा जप्त केला असून ७ आरोपींना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी सर्वांवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

​अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी पारनेर हद्दीतील भाळवणी, टाकळी ढोकेश्वर आणि भनगडेवाडी या गावांमध्ये अवैध दारू विक्री सुरू असल्याच्या तक्रारींवरून कडक कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी विशेष पथकासह २८ मे रोजी ही धडक मोहीम राबवली.

​या कारवाईत पोलिसांनी भाळवणी येथील हॉटेल साई चायनीजमधून अयज बापू भिसे याला ९,४१५ रुपयांच्या दारूसह, तर हॉटेल मदुरामधून बाबासाहेब सिताराम रोहोकले याला ८,१८५ रुपयांच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले. भनगडेवाडी येथील हॉटेल समाधानवर छापा टाकून शुभम किरण रोहोकले याच्याकडून १३,४४० रुपयांची आणि हॉटेल न्यू समाधानमधून धिरज बाजीराव ठोकळ याच्याकडून १३,४३० रुपयांची अवैध दारू जप्त करण्यात आली. टाकळी ढोकेश्वर येथील हॉटेल वर्षावर कारवाई करत पोलिसांनी दिनकर आनंदा नवले याच्याकडून १७,२८५ रुपयांचा साठा पकडला. तसेच भाळवणीच्या हॉटेल रायबामधून महेश गोरख रोहोकले याला ६,१२० रुपयांच्या दारूसह आणि टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल गावकरीमधून महेश कृष्णाजी उर्फ बाबासाहेब झावरे याला १५,६१५ रुपयांच्या अवैध मुद्देमालासह अटक करण्यात आली.

​पकडण्यात आलेले सर्व आरोपी आणि जप्त केलेला मुद्देमाल पुढील कायदेशीर कारवाईसाठी पारनेर पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आला आहे. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५(ई) नुसार एकूण ७ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि माणिक चौधरी, पोसई विनोद परदेशी, सफौ राकेश खेडकर, राजू सुद्रीक, भास्कर मिसाळ, मुकुंद दुधाळ, साईनाथ टेमकर, दीपक फुंदे, नवनाथ दहिफळे, किशोर जाधव, अक्षय रोहोकले, उमेश शेरकर आणि सुधीर गवारी यांच्या पथकाने केली. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे परिसरातील अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले आहेत.

हे सुद्धा वाचा :  आता प्रत्येक पोलीस ठाण्यात अमली पदार्थविरोधी स्वतंत्र युनिट

पोलिसांच्या कारवाईने नागरिकांमध्ये समाधान
नगर-कल्याण हायवेवरील टाकळी ढोकेश्वर, भाळवणी, भानगडेवाडी ,ढोकी आणि सावरगाव काळेवाडी या महत्त्वाच्या गावांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अवैध दारूची विक्री सुरू होती. हायवे लगतच्या हॉटेल्स आणि धाब्यांवर छुप्या पद्धतीने चालणाऱ्या या अवैध धंद्यांमुळे स्थानिक नागरिक, महिला आणि प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.

​या पार्श्वभूमीवर, पोलिसांनी नुकतीच धडक कारवाई करत या परिसरातील अनेक हॉटेल्सवर छापे टाकले आणि मोठ्या प्रमाणावर अवैध दारू साठा जप्त केला. पोलिसांच्या या धाडसी आणि कडक कारवाईमुळे सर्वसामान्य नागरिक समाधान व्यक्त करत आहे.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ