अहिल्यानगर | नगर सह्याद्री
2 जुलै रोजी शहरातील वाडीया पार्क, टिळक रोड परिसरात मोकाट पिसाळलेल्या कुत्र्याने हौदस घालून तब्बल चाळीस जणांना चावा घेतला. यामधील सर्व जिल्हा रुग्णालयात आणि खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. दरम्यान मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीचे निवेदन शिवसेनेने आयुक्त उपस्थित नसल्याने त्यांच्या खुचला चिटकवले.
महानगरपालिकेचे आरोग्य विभाग झोपेचे सोंग घेत असून नागरीकांनी वारंवार कळवुन सुद्धा प्रशासन जागे झालेले नाही. मोकाट कुत्रे पकडण्याचे कंत्राट ज्यांना दिले आहे ती एजन्सी नेमके कोणते कुत्रे पकडते असा सवाल नागरीक करत आहेत. याबाबत शिवसेना आक्रमक झाली असून जोपर्यंत या भागातील व शहरातील मोकाट कुत्रे पकडले गेले नाही तर शिवसेना पद्धतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा इशारा शिवसेना शहर प्रमुख संभाजी कदम यांनी प्रशासनाला दिला आहे.
शिवसेनेच्या वतीने मोकाट कुत्र्यांच्या बाबत निवेदन घेऊन शिष्यमंडळ गेले असता मनपा आयुक्त त्यांच्या दालनामध्ये उपस्थित नव्हते. यावेळी कुठल्याही प्रकारचा अधिकारी निवेदन स्वीकारण्यासाठी आला नाही. यावेळी संतापलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मनपा आयुक्त यांच्या खुचला हे निवेदन चिटकवून याचा जाहीर निषेध केला. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, शहर प्रमुख संभाजी कदम, ज्येष्ठ नगरसेवक बाळासाहेब बोराटे, विक्रम राठोड, दत्ता कावरे, संग्राम कोतकर, राम वडागळे, आप्पासाहेब शिंदे, अभिजीत अष्टेकर आदी उपस्थित होते.










