- जाहिरात -spot_img
breaking news

मान्सूनचे ढग गायब, पावसाला मोठा ब्रेक, काय आहे अंदाज….

मुंबई | नगर सह्याद्री
जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यात दमदार हजेरी लावत मान्सूनने जून महिन्यातील पावसाची तूट भरून काढली होती. त्यामुळे बळीराजा सुखावला होता. मात्र, हा दिलासा आता फार काळ टिकण्याची शक्यता नाही. कारण राज्यामध्ये मान्सूनच्या प्रवासाला पुन्हा एकदा अचानक ब्रेक लागला आहे. त्यामुळे पावसामध्ये मोठा खंड पडण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

प्रशांत महासागरामध्ये अल निनो पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. याचा थेट परिणाम मान्सूनच्या गतीवर झाला आहे. तसेच अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा कमकुवत झाल्यामुळे मान्सूनचे ढग गायब झाले आहेत. त्यामुळे 10 ते 15 जुलै दरम्यान राज्यातील पावसाचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटणार आहे. पुढील काही दिवस पाऊस गायब होऊन उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता आहे.

खरीप पिके धोक्यात, दुबार पेरणीचे संकट?
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आता पाऊस सलग न पडता मोठा खंड घेत पडणार आहे. पावसाने अशीच ओढ दिल्यास राज्यातील खरीप पिके धोक्यात येण्याची भीती आहे. तसेच शेतकऱ्यांवर दुबार किंवा तिबार पेरणीचे संकट ओढवू शकते, ज्यामुळे बळीराजाच्या चिंतेत मोठी भर पडली आहे. सध्या पाऊस गायब झाला असला तरी जुलै महिन्याच्या अखेरीस मान्सून राज्यात पुन्हा एकदा सक्रिय होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मात्र, तोपर्यंतच्या कालावधीत पिकांना पाण्याचा तुटवडा भासण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

हे सुद्धा वाचा :  विजेचे खांब गायब, बांबूचा आधार!....शेतकऱ्यांच्या जिवाशी खेळ
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ