- जाहिरात -spot_img
breaking news

शहर, उपनगरातील वीज पुरवठा सुरळीत करा; भाजप नगरसेवक आक्रमक, वाचा सविस्तर

पालकमंत्र्यांकडे भाजप नगरसेवकांची मागणी
अहिल्यानगर | नगर सह्याद्री

अहिल्यानगर शहर व उपनगरातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. ऐन उन्हाळ्यात नागरिकांना मुबलक पाणी साठा असूनही पिण्याच्या पाण्यासाठी हाल सहन करावे लागत आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबत लक्ष घालावे व वीज पुरवठा सुरळीत करण्याबाबत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांना, कर्मचार्‍यांना आदेश द्यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे भाजपाच्या नगरसेवकांनी केली आहे.

याबाबत भाजपाचे जिल्हा महामंत्री व नगरसेवक निखिल वारे यांनी मंत्री विखे यांना निवेदन दिले आहे. यावेळी उपमहापौर धनंजय जाधव माजी महापौर बाबासाहेब वाकळे, शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, नगरसेवक अनिल बोरुडे, महेश लोंढे, सतीश शिंदे, रवी बारस्कर, विशाल नाकाडे, करण कराळे, सुजय मोहिते, अजय ढोणे, रोहन सानप, सामाजिक कार्यकर्ते अनिल ढवण, पुष्कर कुलकर्णी, तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

अहिल्यानगर शहर व उपनगरातील पाणीपुरवठा गेल्या २ ते ३ महिन्यांपासुन पुर्णपणे विस्कळीत झालेला आहे. अहिल्यानगर शहर व उपनगरांमध्ये वारंवार वीजपुरठा खंडीत होत आहे.

विजपुरवठा वारंवार खंडीत होत असल्यामुळे व्यावसासिक व उद्योजकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने वीज पुरवठा खंडीत झाल्यावर प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अहिल्यानगर शहर व उपनगरातील वारंवार खंडीत होणारा विजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीच्या संबंधित अधिका-यांना व कर्मचा-यांना योग्य ते आदेश देण्यात यावेत अशी मागणी या निवेदनात केली आहे.

हे सुद्धा वाचा :  शिक्षक बीएलओ कामावर, शिक्षण वाऱ्यावर ! मराठी शाळांच्या अस्तित्वावरच घाला?
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ