- जाहिरात -spot_img
breaking news

मान्सून केरळच्या उंबरठ्यावर; महाराष्ट्रात वादळी पाऊस, दोघांचा मृत्यू, ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

मुंबई / नगर सह्याद्री –
महाराष्ट्रात उकाडा काहीसा कमी झाला असून पुढील काही दिवस जोरदार वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह राज्यभरात मान्सूनपूर्व वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मान्सूनपूर्व पडणाऱ्या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून काही प्रमाणावर दिलासा मिळणार आहे. दरम्यान मान्सून केरळच्या उंबरठ्यावर असून पुढील २ दिवसांत त्याचं आगमन होणार आहे. आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडाच्या जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस आणि तुरळक गारपिटीची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात वादळी पावसाचा अंदाज असल्याने येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान आता शेतकरी राजा मान्सूनच्या प्रतीक्षेत आहे.

हवामान विभागाने आज मध्य महाराष्ट्रातील नाशिक तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी वादळी पाऊस आणि तुरळक गारपिटीची शक्यता व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय राज्यातील इतर अनेक भागांतही मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज असल्याने नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात उष्णतेची तीव्रता कमी झाली असली, तरी वातावरणातील आर्द्रता वाढल्यामुळे उकाड्याचा त्रास कायम आहे. दुपारच्या वेळेत उन्हाचा चटका जाणवत असून, काही भागांत ढगाळ वातावरणामुळे तापमानात चढ-उतार होत आहेत. देशभरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून असलेल्या मान्सूनच्या केरळमधील आगमनाचा यंदाचा मुहूर्त काहीसा लांबला आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, अरबी समुद्रात ढग दाटून आले असून मान्सून केरळच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. पुढील दोन दिवसांत मान्सून केरळ तसेच तमिळनाडूच्या दक्षिणेकडील काही भागांत दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

यंदा मान्सूनने अंदमान-निकोबार बेटांमध्ये १६ मे रोजी वेळेआधीच हजेरी लावून दमदार सुरुवात केली होती. त्यामुळे केरळमध्येही तो नेहमीपेक्षा लवकर, म्हणजे २६ मेच्या आसपास दाखल होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र वातावरणातील बदलांमुळे त्याच्या पुढील वाटचालीला काहीसा उशीर झाला आहे. सोमवारी मान्सूनची प्रगती स्थिर राहिली. तथापि, हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार पुढील ४८ तासांत केरळ, तमिळनाडूचा दक्षिण भाग, लक्षद्वीप परिसर, अरबी समुद्राचा काही भाग आणि बंगालच्या उपसागरातील आणखी काही क्षेत्रांमध्ये मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.

हे सुद्धा वाचा :  आयुक्त तुकाराम मुंडेंचा दणका; नाशिक विभागातील ९ हॉटेल्सचे परवाने निलंबित

अवकाळी पावसाचा कहर.! चिमुरडीचा मृत्यू; नगरमध्ये होर्डिंग पडून तरुण जागीच ठार
अहिल्यानगर/मुंबई- राज्यात अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटाने पुन्हा एकदा हाहाकार माजवला आहे. परभणी जिल्ह्यात या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. परभणी तालुक्यातील इंदेवाडी येथे वादळी वाऱ्यामुळे घरावरील पत्रे उडून गेल्यानंतर विटांची भिंत कोसळली. या दुर्घटनेत 11 वषय दिपाली विजय नंदगे हिच्या डोक्यावर भिंत कोसळल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. तर दुसरीकडे अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील राशीन येथे अनधिकृत लोखंडी होर्डिंग कोसळून 24 वषय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वादळी वाऱ्यादरम्यान घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी संबंधितांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

अवकाळी पावसामुळे राज्यात ठिकठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. गंगाखेड तालुक्यातील गौंडगाव येथे वीज कोसळून शेतकरी किरण कराळे यांचा एक बैल आणि एक गाय दगावली. शेतीसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली जनावरे गमावल्याने कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.
तसेच पोखरणी रेल्वे स्थानकावर वादळी वाऱ्यामुळे पत्र्याचे शेड उडून थेट ओव्हरहेड वायरवर पडले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम टळला.

काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी
भारतीय हवामान विभागाने राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी महत्त्वाचा इशारा जारी केला आहे. यामध्ये मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र तसेच छत्रपती संभाजीनगर विभागातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आणि गारपिटीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे पुढील 24 तास नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हवामान विभागाने काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला असून, विजांच्या कडकडाटासह ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली आहे.

राशीन येथे मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील राशीन येथे अनधिकृत लोखंडी होर्डिंग कोसळून 24 वषय अमित मोहन सुकाळ यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसादरम्यान महात्मा फुले चौकातील होर्डिंगवर लावलेल्या बॅनरला छिद्रे पाडण्याचे काम सुरू होते. बॅनर फाटू नये म्हणून अमित यांना होर्डिंगवर चढण्यास सांगण्यात आले होते. मात्र, अचानक वाऱ्याचा वेग वाढल्याने संपूर्ण होर्डिंग कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी या प्रकरणी विकास लहू सायकर यांच्याविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ