अळकुटीत कुस्ती स्पर्धेचे आयोजन; लाखो रुपयांच्या बक्षिसांची खैरात
निघोज | नगर सह्याद्री
पैलवान ग्रुप, टायगर ग्रुप व धर्मरक्षक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य निकाली कुस्त्यांचा महासंग्राम आयोजित करण्यात आला आहे. अळकुटी (ता.पारनेर) येथील साईनाथ विद्यालयाच्या मैदानावर रविवारी (ता.२९) सकाळी दहा वाजता या स्पर्धेला सुरुवात होणार असून, तालुयासह जिल्ह्यातील कुस्तीप्रेमींमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे.
या स्पर्धेतील मुख्य आकर्षण म्हणजे धर्मरक्षक केसरी किताब असून विजेत्यास तब्बल तीन लाख रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येणार आहे. या मानाच्या गादीसाठी पै. सिंकदर शेख, पै. हर्षद सदगिर या नामांकित मल्लांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. अंतिम लढतीत अव्वल दर्जाचे पैलवान आपली ताकद आजमावणार आहेत.
स्पर्धेत विविध गटांमध्ये कुस्त्या ठेवण्यात आल्या असून, प्रत्येक गटासाठी आकर्षक रोख बक्षिसांची तरतूद करण्यात आली आहे. लहान गटांपासून ते खुल्या गटापर्यंत सर्व स्तरांतील मल्लांना संधी देण्यात आली आहे.
तसेच विजेत्या व उपविजेत्यांना सन्मानचिन्ह, चषक व रोख पारितोषिक देण्यात येणार आहे.
या कुस्ती स्पर्धेसाठी पुणे, मुंबई तसेच राज्यातील विविध भागांतून नामांकित पैलवान सहभागी होणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना दर्जेदार व थरारक सामने पाहायला मिळणार आहेत. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी उद्योजक सोपान लंके, उद्योजक राजु शेख, उद्योजक सुनिल शेटे, जिल्हा परिषद सदस्य अमित घनदाट, पंकज कारखिले, दीपक ठोंबरे, डॉ.भास्कर शिरोळे, जितेश सरडे, अलताफ शेख, बंडू साबळे, सदानंद आवारी, कैलास आवारी, संजय बाबर, आर्यन बाबर, नगराध्यक्षा विद्या कावरे, गणेश मापारी, संदेश कापसे, श्रीकांत डेरे, पारनेर तालुका पैलवान प्रतिष्ठानचे पदाधिकारी पैलवान हनुमंत भोसले, बाळासाहेब पुंडे, संतोष काटे तसेच त्यांचे शेकडो सहकारी व निलेश लंके प्रतिष्ठान प्रायोजक म्हणून पुढाकार घेत आहेत. तसेच परिसरातील अनेक मान्यवर, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहकार्य करत आहेत.
स्पर्धेच्या निमित्ताने अळकुटी व परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे. कुस्तीप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या महासंग्रामाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजक सुभाष वराळ, सुनिल म्हसके, शिवाजी उचाळे, महेश दाते, सचिन मोरे, किरण चौधरी, आदेश बरकडे यांच्याकडून करण्यात आले आहे.
राज्यातील नामवंत पैलवानांची कुस्ती
गेली दहा वर्षांपूर्वी निघोज येथे भव्य कुस्ती स्पर्धेचे पारनेर तालुका पैलवान प्रतिष्ठानने आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी राज्यातील शंभर पेक्षा नामवंत पैलवानांनी हजेरी लावून कुस्ती स्पर्धेचा नावलौकिक राज्यात केला होता. त्यानंतर प्रथमच अळकुटी येथे राज्यातील नामवंत पैलवानांची कुस्ती पारनेर तालुयातील कुस्ती शौकीनांना पहावयास मिळत असून, या स्पर्धेसाठी जुन्नर, शिरुर पारनेर, श्रीगोंदा तालुयासहीत मुंबई, पुणे, अहिल्यानगर जिल्ह्यातील कुस्ती शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित राहतील, तसे नियोजन पैलवान प्रतिष्ठान, टायगर ग्रुप, धर्मरक्षक प्रतिष्ठान, निलेश लंके प्रतिष्ठान यांनी केले आहे.










