- जाहिरात -spot_img
breaking news

पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने तोफखाना पोलिसांचे पायी संचलन; टवाळखोरांसह बेशिस्त वाहनचालकांवर कठोर कारवाई

अहिल्यानगर | नगर सह्याद्री

जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिलेल्या विशेष सूचना आणि आदेशानुसार, तोफखाना पोलीस ठाण्याच्या वतीने शहरात जोरदार पायी संचलन (पेट्रोलिंग) करण्यात आले. पोलिसांचा मोठा ताफा अचानक रस्त्यावर उतरल्याने बेशिस्त वाहनचालक आणि टवाळखोरांची मोठी धावपळ उडाली. या धडक मोहिमेमुळे गुन्हेगारांवर जरब बसली असून नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

शहरातील मुख्य वर्दळीचे भाग असलेल्या कोठला, कोंड्यामामा चौक, सर्जेपुरा चौक आणि दिल्ली गेट यांसारख्या संवेदनशील ठिकाणी पोलिसांनी पायी गस्त घातली. यावेळी रस्त्यावर विनाकारण फिरणारे आणि नियमांचे उल्लंघन करणारे पोलिसांच्या रडारवर होते. या कारवाईत पोलिसांनी प्रामुख्याने दुचाकीवर ट्रिपल सीट प्रवास करणारे, तसेच वाहनांवर विचित्र (फॅन्सी) नंबर प्लेट लावणार्‍या वाहनचालकांवर दणका दिला. ज्या गाड्यांना नंबर प्लेट नव्हती, त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्यात आली.

तसेच, ज्या चारचाकी वाहनांच्या काचांना काळे आच्छादन (फिल्म) लावण्यात आले होते, अशा सर्व गाड्या थांबवून पोलिसांनी जागीच त्या काचांवरील फिल्म काढून टाकल्या. रस्त्याला अडथळा ठरणारे हातगाडे आणि अनधिकृत अतिक्रमणांवरही तोफखाना पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. या धाडसी कारवाईमुळे रस्त्यावरील टवाळखोर आणि रोड रोमिओ यांच्यावर अंकुश बसण्यास मदत होईल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे. नियमांचे उल्लंघन करणार्‍यांनी तातडीने आपल्या वाहनांवरील फॅन्सी नंबर प्लेट बदलून घ्याव्यात, असे आवाहन तोफखाना पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा :  नाशिकच्या लाल मातीत पारनेरचा डंका; चेतन रेपाळे ‘तपोवन हनुमान केसरी’चा मानकरी
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ