शिववरद प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती व महिला दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिरास प्रतिसाद
अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेकजण आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहेत. वेळे अभावी नियमित आजारांची तपासणी होत नाही, त्यामुळे अनेक आजार उशिरा निदर्शनास येतात. अशा परिस्थितीत मोफत आरोग्य तपासणी शिबिरांमुळे आजाराच निदान होत नागरिकांना योग्य वेळी तपासणी करून घेण्याची संधी मिळते. महिलांचे आरोग्य चांगले असेल तरच कुटुंब व समाजाची प्रगती शक्य आहे. म्हणून महिलांनी कुटुंबातील सर्वांची काळजी घेताना स्वतःच्याही आरोग्याकडे तितकेच लक्ष देणे आवश्यक आहे. शिववरद प्रतिष्ठानने मोफत सर्वरोग तपासणी शिबीराचे आयोजन करून अत्यावश्यक उपक्रम राबवला आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अॅड.सचिन जगताप यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती व आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या औचित्य साधून शिववरद प्रतिष्ठान आयोजित मोफत सर्वरोग तपासणी शिबीराचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अॅड.सचिन जगताप यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नगरसेविका आशा डागवाले, माजी सभापती किशोर डागवाले, नगरसेवक संभाजी लोंढे, शिववरद प्रतिष्ठानचे अध्यक्ष सागर गोरे, महिला मंडळाच्या अध्यक्षा आरती आढाव, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष बाबासाहेब वैद्य, रोहन डागवाले आदींसह विविध क्षेत्रातील नागरिक व शालेय विद्यार्थी उपस्थित होते.
नगरसेविका आशा डागवाले म्हणाल्या, समाजातील सर्वसामान्य नागरिक व महिलांना आरोग्याबाबत जागरूक करणे तसेच त्यांना मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठीया शोबिराचे आयोजन केले आहे. या शिबिराला नागरिकांचा व महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभाला आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत किशोर डागवाले यांनी केले. या शिबिरात नागरिकांची सर्वसाधारण आरोग्य तपासणी बरोबरच सर्व प्रकारची रक्त तपासणी, नेत्र व मोतीबिंदू तपासणी, गरोदर महिलांची तपासणी, मोफत एक्स-रे आदी सुविधा नागरिकांना सिटी केअर हॉस्पिटल व म.न.पाच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या सहकार्याने उपलब्ध करून देण्यात आल्या.
यावेळी अनिल धाडगे, नितीन डागवाले, सचिन भिंगारकर, राजेंद्र पडोळे, बाबासाहेब दळवी, बाळासाहेब भुजबळ, डॉ.रणजीत सत्रे, सुहास पाथरकर, मुकुंद वाळके, जालिंदर बोरुडे, रामदास फुले, इलियास शेख, रौफ खान, मुकुंद वाळके, दत्तात्रय भागानगरे, अनिल लोंढे, मयूर मैड, राजीव गायकवाड, विनोद पुंड, अनिल इंगळे, महिला मंडळाच्या उपाध्यक्षा उज्वला भांगे, रिकिता गवळी, सविता डागवाले, हिरा जाधव, सुनिता शिंदे, छाया घुगे, तारा घुगे, प्रमिला गणगले, गीता गोयल, चंद्रकला गोयल व मीना गणगले आदी उपस्थित होते.










