- जाहिरात -spot_img
breaking news

गडाख, राजळेंनी गड राखले; कारखाना निवडणुकीत काय घडलं पहा

नेवासा/ पाथर्डी । नगर सह्याद्री
मुळा सहकारी साखर कारखाना व वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत माजी मंत्री शंकराव गडाख व आमदार राजळे गटाने निर्विवाद वर्चस्व कायम राखले आहे. मुळा कारखान्याच्या चारही जागेवर गडाख गटाचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आले असून वृद्धेश्‍वर कारखाना निवडणुकीत दोन्ही जागेवर राजळे यांच्या आदिनाथ शेतकरी मंडळाचे उमेदवार मताधिक्याने निवडून आल्याने कारखान्यावर एकहाती सत्ता मिळविली आहे.

मुळा कारखान्याच्या निवडणुकीत माजी मंत्री शंकरराव गडाख गटाच्या सहकार मंडळाच्या 18 जागा बिनविरोध झाल्या होत्या. विरोधकांमुळे चार जागेसाठी शुक्रवारी निवडणूक झाली. शनिवारी सकाळी मतोजणी होऊन करजगाव गटातून चंद्रकांत टेमक 6894, डॉ. ज्ञानेश्‍वर दरंदले 6725 मते मिळवून विजयी झाले. महिला राखीव मतदार संघातून कमल चांगदेव दहिफळे 7401 व विमल नारायण सोनवणे 7191 मते मिळवून विजयी झाले. गडाख गटाचे चारही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्याने मुळा कारखान्यावर गडाख गटाची सत्ता कायम राहिली. विरोधकांनी चार जागेसाठी निवडणूक लादली असली तरी सभासदांनी गडाख यांच्या नेतृत्वावर विश्‍वास कायम ठेवल्याने निवडणूक निकालातून दिसून आले. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून फटाके फोडत जल्लोष केला.

पाथर्डी तालुक्यात वृद्धेश्‍वर कारखान्याच्या दोन जागेसाठी तीन उमेदवारी अर्ज राहिल्याने येथे शुक्रवारी मतदान झाले होते. यामध्ये आदिनाथ शेतकरी मंडळाचे उमेदवार आप्पासाहेब राजळे यांना 4932 व उद्धव वाघ यांना 4158 इतके मते पडून विजयी झाले. तर विरोधी शिवशंकर राजळे यांना 1642 मतांवर समाधान मानावे लागले. मतमोजणीचा निकाल लागल्यानंतर राजळे समर्थकांनी गुलालाची उधळण करत एकच जल्लोष केला. यापूर्वीच सत्ताधारी आ. मोनिका राजळे गटाने 17 जागा बिनविरोध मिळवल्या होत्या. आता उर्वरीत दोन जागांही भरघोस मतांनी जिंकल्याने सर्वच्या सर्व जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे.

हे सुद्धा वाचा :  दुचाकीचा कट लागल्याचा जाब विचारल्याने वाद, तरुणावर कोयत्याने हल्ला, विहिरीच्या वादातून राडा
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ