- जाहिरात -spot_img
breaking news

देवदर्शनाला गेलेल्या तरुणासह नातेवाईकांना मारहाण

अहिल्यानगर | नगर सह्याद्री

नगर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आगडगाव येथे देवदर्शनासाठी गेलेल्या एका तरुणाला आणि त्याच्या नातेवाईकांना जुन्या वादातून चौघांनी लाकडी काठी व दगडाने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी निरज किरण ताठे हे त्यांच्या बहिणीच्या सासू आणि सासर्‍यांसोबत आगडगाव येथील काळभैरवनाथ मंदिरात  देवदर्शनासाठी गेले होते. यावेळी त्या ठिकाणी आरोपी तुळशीदास विश्वनाथ बोरुडे, ताराचंद विश्वनाथ बोरुडे, राम अशोक कराळे आणि प्रशांत ताराचंद बोरुडे हे आले. तुमच्या मुलांवर पहिला गुन्हा दाखल केला आहे, तुमची जिरली नाही का? असे म्हणत आरोपींनी फिर्यादीच्या नातेवाईकांशी वाद घालण्यास सुरुवात केली. तुम्ही खोटा गुन्हा दाखल केला आहे असे फिर्यादीच्या नातेवाईकांनी म्हणताच आरोपींचा राग अनावर झाला.या रागातून आरोपींनी सर्वांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.

तसेच तेथे पडलेल्या लाकडी काठीने आणि दगडाने निरज ताठे यांच्या दोन्ही पायांवर प्रहार करून त्यांना जखमी केले. तुमची मुले कशी नोकरी करतात तेच बघतो, त्यांना घरी बसवू अशी धमकीही यावेळी आरोपींनी दिली. या घटनेनंतर निरज ताठे यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार सरोदे करत आहेत.

हे सुद्धा वाचा :  खंडाळा परिसरात भीषण अपघात; वाहनाचा चक्काचूर, लष्करी जवानाचा जागीच मृत्यू , दोन गंभीर जखमी
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ