- जाहिरात -spot_img
breaking news

शनिदेव मंदीर परिसर कुलूप बंद करणे चुकीचे; खासदार निलेश लंके काय म्हणाले पहा

प्रशासनाला पत्रव्यवहार करणार | निर्णयाचा फेरविचार करावा
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्ट, शनिशिंगणापूर येथील दोन नंबरचे प्रवेशद्वार बंद करण्यात आल्यामुळे खासदार निलेश लंके यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दोन नंबरचे प्रवेशद्वार बंद केल्यामुळे भाविकांना नाहक त्रास होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत शनिदेवाला कुलूप बंद करणे चुकीचे असल्याचे मत खासदार लंके यांनी म्हटले आहे. प्रशासनाने या निर्णयाचा फेरविचार करावा, याबाबत प्रशासनाला पत्रव्यवहार करणार असल्याचे ते म्हणाले.

शनि शिंगणापूर येथील दोन नंबरचे प्रवेशद्वार बंद केल्याने खा.नीलेश लंके यांच्यासह नगरसेवक योगीराज गाडे यांनी शिंगणापूर गाठले. प्रवेशद्वारे बंद असलेल्या ठिकाणी जात गेटला कुलूप लावल्याने नाराजी व्यक्त केली. अशा प्रकारे गेट बंद करण्याऐवजी याठिकाणी सुरक्षारक्षक ठेवला असता तर भाविकांचे हाल झाले नसते. दर्शनासाठी येणार्‍या भाविकांच्या विचार देवस्थान प्रशासनाने करणे गरजेचे होते. त्यामुळे देवस्थानचे अधिकारी यांनी या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी खा. लंके यांनी केली.

शनि शिंगणापूरमध्ये दोन नंबर प्रवेशद्वार बंद
शनिशिंगणापूर – श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्टने शिंगणापूर येथील दर्शन व्यवस्थेमध्ये महत्त्वाचा बदल करण्यात आला असून, देवस्थान प्रशासनाने २ नंबर प्रवेशद्वार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पोलीस प्रशासनाचा गोपनीय अहवाल आणि भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

शनीशिंगणापूर येथील मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर जगभरातील भाविकांची मोठी वर्दळ असते. या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या उपाययोजना अधिक कडक करण्यात येत आहेत. सध्या श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या एकाच प्रवेशद्वारावर बॉम्बशोधक यंत्र आहे. आता लवकरच अत्याधुनिक बॉम्ब शोधक यंत्र (मेटल डिटेटर ) बसवण्यात येणार असल्याचे समजते. श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्टचे, मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल चोरमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, भाविकांच्या  सुरक्षिततेला प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवेशद्वार क्रमांक दोन बंद ठेवून केवळ महत्त्वाच्या व्यक्तींनाच मर्यादित प्रवेश दिला जाणार आहे. सर्वसामान्य भाविकांसाठी मुख्य प्रवेशद्वाराचा वापर करण्यात येईल. रविवार दि.२६ एप्रिलपासून गेट क्रमांक २ बंद करण्यात येणार असून, मुख्य प्रवेशद्वारातून सुरू राहणार असल्याचे सीईओ चोरमारे यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा :  लोकन्यायालयात तुटलेले नाते पुन्हा जुळले; तीन वर्षांच्या चिमुकलीला मिळाले आई-वडिलांचे पुन्हा एकत्र छत्र

दरम्यान, या निर्णयामुळे स्थानिक व्यावसायिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. प्रवेशद्वार क्रमांक दोनच्या मार्गावर अनेक पूजासाहित्य व तेल विक्रीची दुकाने सुरू झाली होती. भाविकांची वर्दळ या मार्गाने होत असल्याने व्यवसायाला चालना मिळत होती. मात्र आता प्रवेश बंद झाल्याने व्यापारावर परिणाम होण्याची शयता व्यक्त केली जात आहे.

पूर्वी कोट्यवधी रुपयांचा खर्च करून दर्शन मार्ग उभारण्यात आला होता. तसेच गावकर्‍यांसाठी गावकरी गेट म्हणून स्वतंत्र सुविधा देण्यात आली होती. या मार्गाचा वापर करून महत्त्वाच्या व्यक्ती व त्यांच्या वाहनांना प्रवेश मिळत होता. मात्र सुरक्षा कारणास्तव आता या व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. पोलीस विभागाचा अहवाल आणि विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ही नवी व्यवस्था पुढील आदेश येईपर्यंत कायम राहणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ