- जाहिरात -spot_img
breaking news

मला कोणावर अवलंबून राहायचं नाही; कृतिका कामराचं लग्नाबद्दल स्पष्ट मत

मुंबई : नगर सह्याद्री –
टीव्हीपासून वेब सिरीजपर्यंत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री कृतिका कामरा सध्या पुन्हा चर्चेत आहे. नुकतीच तिची ‘मटका किंग’ ही सिरीज प्रदर्शित झाली असून तिच्या लग्नाचीही जोरदार चर्चा सुरू आहे. तिने अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत तिच्या करिअर आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल मोकळेपणाने संवाद साधला.

कृतिका कामराने ३७ व्या वर्षी गौरव कपूरसोबत लग्न केलं. उशिरा लग्न केल्याबद्दल ती म्हणते की, “लहान वयात लग्न न केल्याचा मला खूप आनंद आहे. त्या वयात आपली विचारसरणी पूर्ण विकसित झालेली नसते.” ती सांगते की, तिच्या कुटुंबाने कधीही लग्नासाठी दबाव टाकला नाही. तिच्या आई-वडिलांनी मुलगा आणि मुलगी असा भेदभाव न करता दोघांनाही समान संधी दिली.

प्रेम आणि नात्यांविषयी तिचा दृष्टिकोनही काळानुसार बदलला आहे. ती म्हणते की, टीनएजमध्ये आपण चित्रपट आणि गाण्यांमुळे खूप रोमँटिक विचार करतो. पण वयानुसार अनुभव वाढतात आणि आपण वास्तव समजू लागतो. २० ते ३० या वयात तिने स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे ओळखलं. “मी कोण आहे, मला काय हवं आहे आणि माझ्या आयुष्यातील प्राधान्य काय आहेत, हे मला समजलं,” असं ती सांगते.

गौरव कपूरसोबतच्या नात्याबद्दल बोलताना कृतिका म्हणते की, दोघेही स्वतंत्र आणि स्वतःच्या कष्टावर उभे राहिलेले आहेत. “मी भावनिक आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहे. मला कोणावर अवलंबून राहण्याची गरज नाही,” असं ती स्पष्टपणे सांगते. लग्नानंतर आयुष्यात फारसा बदल जाणवला नाही, असंही ती नमूद करते.

कृतिका एका छोट्या शहरातून आली आहे. तिच्या कुटुंबाचा फिल्म इंडस्ट्रीशी काहीही संबंध नव्हता. तिची आई प्राचार्य आणि वडील डॉक्टर आहेत. अशा पार्श्वभूमीतून मुंबईत येऊन अभिनय क्षेत्रात करिअर करणं तिच्यासाठी मोठं पाऊल होतं. तरीही तिने धाडस दाखवत या क्षेत्रात स्वतःची जागा निर्माण केली.

टीव्ही इंडस्ट्रीत यशाच्या शिखरावर असताना तिने अचानक ते क्षेत्र सोडून फिल्म आणि वेब सिरीजकडे वळण्याचा मोठा निर्णय घेतला. त्या वेळी अनेकांनी हा निर्णय चुकीचा असल्याचं सांगितलं होतं. पण कृतिकाने धोका पत्करला आणि आज ती वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिकांमुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.

हे सुद्धा वाचा :  नागराज मंजुळे यांच्या 'खाशाबा' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित; राजकारणातून थेट चित्रपटात...

तिच्या प्रेरणेबद्दल विचारलं असता कृतिका सांगते की, जीनत अमान तिची आयकॉन आहे. त्यांच्या कामाचा आणि व्यक्तिमत्त्वाचा तिच्यावर मोठा प्रभाव आहे. कृतिकाच्या मते, जीनत अमान यांनी नेहमीच वेगळ्या वाटेवर चालत स्वतःची ओळख निर्माण केली. आज कृतिका कामरा आपल्या मेहनतीच्या जोरावर इंडस्ट्रीत स्थिरावली आहे आणि पुढेही वेगळं आणि दर्जेदार काम करण्यासाठी ती सज्ज आहे.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ