- जाहिरात -spot_img
breaking news

गोरेगावच्या लाल मातीत कुस्तीचा थरार; आमदार काशिनाथ दाते काय म्हणाले पहा…

बाबासाहेब तांबे सोशल फाउंडेशनचे नियोजन जिल्ह्यात आदर्श – आमदार काशिनाथ दाते
​पारनेर / नगर सह्याद्री –
अंबिका माता यात्रा उत्सवाचे औचित्य साधून मॉडेल व्हिलेज गोरेगाव येथे ‘मा. सभापती बाबासाहेब तांबे सोशल फाउंडेशन’च्या वतीने आयोजित करण्यात आलेला भव्य दिव्य कुस्तीचा जंगी आखाडा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. “बाबासाहेब तांबे सोशल फाउंडेशनच्या कुस्ती मैदानाचा नावलौकिक संपूर्ण जिल्ह्यात असून, त्यांचे शिस्तबद्ध नियोजन सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, असे गौरवद्गार आमदार काशिनाथ दाते यांनी यावेळी काढले.

​कार्यक्रमाची सुरुवात पै. कोंडीबा भाऊ तांबे यांच्या हस्ते आणि सबाजीराव देठे, शिवाजीराव शेरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मैदान पूजनाने झाली. फाउंडेशनचे मुख्य प्रवर्तक व जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाबासाहेब तांबे यांनी आखाड्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि कुस्त्यांची रचना जाहीर केल्यानंतर प्रत्यक्ष लढतींना सुरुवात झाली.

​यावेळी व्यासपीठावर माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील, भाजप तालुकाध्यक्ष राहुल शिंदे, सभापती गणेश शेळके, मार्केट कमिटी संचालक शंकरराव नगरे, शिवसेना तालुकाप्रमुख अरुणराव ठाणगे, डॉ. श्रीकांत पठारे, एस. बी. शेटे, राम गुंड, माजी सरपंच डॉ. राजेश भनगडे, अप्पासाहेब शिंदे यांसह राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते.
​या कुस्ती मैदानात कोल्हापूर, पुणे, सातारा, नाशिक आणि अहिल्यानगरसह संपूर्ण महाराष्ट्रातून तब्बल ५०० हून अधिक मल्लांनी सहभाग नोंदवला. कुस्त्यांची जोड २०० रुपयांपासून सुरू होऊन शेवटची मानाची कुस्ती २ लाख ११ हजार रुपयांपर्यंत लावण्यात आली होती.
​बाळू बोडखे, सतपाल सोनटक्के, चेतन रेपाळे, निलेश उचाळे, भरत होळकर, कुमार देशमाने, विजय पवार, पारस बिडकर, मनोज फुले यांसारख्या अनेक नामवंत पैलवानांनी आपल्या डावांनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. एकेरी पट, दुहेरी पट, ढाक, धोबी, कलाजांग आणि साल्टो अशा विविध डावांची उधळण यावेळी पाहायला मिळाली.

​दुपारी ३ वाजता सुरू झालेला हा कुस्त्यांचा थरार रात्री १० वाजेपर्यंत अखंडपणे सुरू होता. लख्ख प्रकाशझोत, फटाक्यांची आतिषबाजी आणि कोल्हापूरचे सुप्रसिद्ध हलगीवादक रणजीत आवळे यांच्या हलगीच्या कडकडाटात कुस्ती शौकीन न्हाऊन निघाले होते. ‘गजर ज्ञानोबा माऊलीचा’ या यूट्यूब चॅनलवर या आखाड्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.

हे सुद्धा वाचा :  टाकळी ढोकेश्वर, भाळवणीतील अवैध दारू विक्री करणाऱ्या ७ हॉटेल्सवर पोलिसांचा छापा; मोठा मुद्देमाल जप्त

​सरपंच परिषदेचा ‘जनसेवक पुरस्कार’ मिळाल्याबद्दल फाउंडेशनचे सदस्य प्रितेश पानमंद यांचा आमदार काशिनाथ दाते यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. कुस्ती पंच म्हणून राष्ट्रीय मार्गदर्शक गणेश जाधव, पै. दादाभाऊ नरसाळे, अण्णा पाटील नरसाळे, साहेबराव तांबे व गणेश चौरे यांनी काम पाहिले.

​कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन संदीप तांबे यांनी केले, तर अक्षय मुळूक व प्रितेश पानमंद यांनी कुस्ती निवेदक म्हणून आखाडा जिवंत केला. या मैदानाच्या यशस्वीतेसाठी राजाराम नरसाळे, बाबासाहेब चौरे, सुभाष नांगरे, भाऊसाहेब तांबे, संतोष नरसाळे, संपत नरसाळे, पांडुरंग नरसाळे आणि विजय तांबे पाटील यांच्यासह फाउंडेशनच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ