- जाहिरात -spot_img
breaking news

बारावीचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनीच मारली बाजी, राज्याचा निकाल ‘इतके’ टक्के पहा सविस्तर…

मुंबई / नगर सह्याद्री
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज अधिकृतपणे जाहीर करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्याच्या निकालात मुलींनीच वर्चस्व गाजवले आहे. राज्याचा निकाल ८९.७९ टक्के लागला.

पुणे, मुंबईसह अनेक विभागांचा निकाल समाधानकारक लागला आहे. सर्वात जास्त निकाल कोकण विभागाचा तर सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा लागला आहे. दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना https://mahahsscboard.in/ अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे. राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंग आणि राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी बारावीच्या निकालाबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली.

निकालाची महत्त्वाची आणि ठळक वैशिष्ट्ये काय?
राज्याचा एकूण निकाल: ८९.७९%
मुलींचा निकाल: ९३.१५ %
मुलांचा निकाल: ८६.८० %
सर्वात जास्त निकाल असलेला विभाग : कोकण

कोणत्या विभागाचा निकाल किती लागला?
पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या ९ विभागातून १४ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. यामध्ये कोकण विभागाने आपला दबदबा कायम राखला. मुंबई आणि पुणे विभागाचा निकालही चुरशीचा लागला आहे.

पुणे ९१.२५
नागपूर ८८.६७
छत्रपती संभाजीनगर ८८६८
कोल्हापूर ८९.९७
अमरावती ९०.९२
नाशिक ९०..७२
लातूर ८४.१४
कोकण ९४.१४
मुंबई ९०.०८

निकाल कुठे पाहायचा?
विद्यार्थी आपला निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर पाहू शकतात:
mahahsscboard.in
hscresult.mahahsscboard.in
hscresult.mkcl.org

बारावीचा निकाल कसा पाहाल?
वरील पैकी कोणत्याही एका अधिकृत वेबसाइटवर जा
‘HSC Examination Result 2025’ या लिंकवर क्लिक करा
तुमचा सीट नंबर किंवा रोल नंबर टाका
तुमच्या आईचे पहिले नाव टाका
‘View Result’ वर क्लिक करा
तुम्हाला तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल, त्याचा स्क्रीनशॉट किंवा प्रिंटआऊट तुम्ही घेऊ शकता

हे सुद्धा वाचा :  कांदा उत्पादकांच्या संतापाचा उद्रेक....लिलाव पाडले बंद
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ