- जाहिरात -spot_img
breaking news

एलपीजी गॅसचा पुरवठा त्वरित सुरळीत करा; अहिल्यानगरमध्ये भाजपने काय केले पहा

घरगुती ग्राहक, विद्यार्थी वसतिगृह व माध्यान्ह भोजन यांना गॅस पुरवठ्यासाठी प्राधान्य द्या / शहर भाजपाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
युद्धजन्य परीस्थीतीमुळे एलपीजी गॅसचा मोठ्याप्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. या परीस्थितीचा गैरफायदा घेत काही गॅस वितरण संस्थांकडून नागरिकांची उघडपणे आर्थिक पिळवणूक करत आहे. या परिस्थितीमुळे सर्वसामान्य नागरिक घाबरलेले असून घरगुती गॅस सिलेंडर साठी तासनतास उन्हातान्हात रांगेत उभे राहत आहेत. हीच परिस्थिती औद्योगिक क्षेत्राची असून अनेक कारखान्यांना एलपीजी गॅस अभावी उत्पादन बंद करावे लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने त्वरित एलपीजी गॅस पुरवठा सुरळीत करून काळाबाजार बंद करावा व नागरिकांना दिलासा द्यावा. घरगुती ग्राहक, विद्यार्थी वसतिगृह व माध्यान्ह भोजन यांना गॅस पुरवठ्यासाठी प्राधान्य द्यावे, अशी मागणी भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांनी जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्याकडे केली.

यावेळी सरचिटणीस निखिल वारे, मनपा गटनेत्या शारदा ढवण, महिला अध्यक्षा प्रिया जानवे आदींसह पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.
नगरसेवक निखील वारे म्हणाले, अहिल्यानगर शहरात घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरची तीव्र टंचाई निर्माण झाली असून सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या परिस्थितीचा गैरफायदा घेत काही गॅस वितरण संस्थांकडून नागरिकांची उघडपणे आर्थिक पिळवणूक करत आहेत. गॅस सिलेंडर बुकिंग करूनही नागरिकांना वेळेत सिलेंडर मिळत नाहीत. सिलेंडरची होम डिलिव्हरी करणारे अतिरिक्त पैसे मागत आहेत. सिलेंडर डिलिव्हरीच्या ठिकाणी संबंधित गॅस एजन्सीने नागरिकांसाठी सावलीची, पाण्याची व तातडीच्या औषधोपचाराची व्यवस्था करावी. तीव्र उन्हामुळे जर एखादी दुर्दैवी घटना घडली तर त्याची पूर्णपणे जबाबदारी गॅस वितरण कंपनीची आहे.

सिलेंडरचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून नागरिकांना जादा दराने गॅस घेण्यास भाग पाडले जात असल्याची शंका देखील नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. त्यामुळे अहिल्यानगर शहरातील जनतेमध्ये प्रचंड संतापाची भावना निर्माण झाली आहे. प्रशासनाने या प्रकरणाची तात्काळ सखोल चौकशी करून काळाबाजार करणाऱ्या गॅस वितरण संस्थांवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत व पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, असेही निवेदनात नमूद केल आहे.

हे सुद्धा वाचा :  20 वर्षांपूर्वी झालेला रस्ता पूर्णपणे उखडला; खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका

यावेळी भरत ठुबे, उदय अनभूले, सुशांत जाधव, अजय ढोणे, राजू मंगलारप, सतीश शिंदे, विशाल नाकाडे, मयुरी जाधव, करण कराळे, रोहन सानप, संजय गायकवाड, विजय गायकवाड, रेणुका करंदीकर व राखी आहेरआदी उपस्थित होते.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ