- जाहिरात -spot_img
breaking news

जिल्हा बँकेसह ज्ञानेश्वर, मुळा, वृध्देश्वर कारखान्यांच्या निवडणुका आता दिवाळीनंतरच

राहुरी पोटनिवडणुकीमुळे नगर जिल्ह्यातील सहकारच्या निवडणुका लांबणीवर
अहिल्यानगर | नगर सह्याद्री –
राज्यात जाहीर झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीमुळे सहकार विभागाने अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका 31 मे 2026 पर्यंत पुढे ढकलल्या आहेत. याबाबत सहकार विभागाने सोमवारी यासंदर्भातील शासन आदेश जारी केला. या आदेशाच्या दिनांकापासून सध्या सहकारी संस्थांच्या निवडणुका ज्या टप्प्यावर असतील त्या टप्प्यावर 31 मे पर्यंत लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. या आदेशातून सहकारी गृहनिर्माण संस्थांना वगळण्यात आले आहेत. यामुळे नगर जिल्ह्यातील जिल्हा बँकेसह ज्ञानेश्वर, मुळा आणि वृध्देश्वर साखर कारखान्यांची निवडणुका दिवाळीपर्यंत लांबवणार आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे अनुक्रमे बारामती, राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी येत्या 23 एप्रिल रोजी मतदान होत आहे. या पोटनिवडणुकीमुळे प्रशासनिक आणि पोलीस यंत्रणा व्यग्र राहणार आहे. त्यामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुकीसाठी आवश्यक मनुष्यबळ, पोलीस बंदोबस्त, मतदान केंद्रांची उपलब्धता याबाबत अडचणी निर्माण होण्याची शक्यता असल्याचे आदेशात म्हटले आहे.

परंतु, विभागाने सहकारी संस्थांच्या निवडणुकीनंतरची पहिली पदाधिकारी निवड करणे, संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या राजीनाम्यामुळे अन्य पदाधिकार्‍यांची निवड करणे, पदाधिकार्‍याचा राजीनामा, मृत्यूमुळे रिक्त झालेल्या जागेवर अन्य संचालकांची निवड करणे, क आणि ड वर्गातील सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया, ज्या सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेत नामनिर्देशनाचा टप्पा सुरु झाला आहे, अशा निवडणुकांना हा आदेश लागू राहणार नसल्याचे सहकार विभागाने स्पष्ट केले आहे. याबाबत सोमवारी सायंकाळी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव अशोक गाडे यांनी स्वतंत्रपणे आदेश काढले आहेत.

नगर जिल्ह्यातील ज्ञानेश्वर, मुळा आणि वृध्देश्वर साखर कारखान्यांच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिध्द झाली होती. या यादीवर सुचना आणि हरकती घेवून येत्या 1 एप्रिलाला अंतिम मतदार यादी प्रसिध्द होणार होती. मात्र, राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीमुळे नगर जिल्ह्यातील सहकारातील अ व ब वर्गातील संस्था आणि बँकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. या निवडणूका 31 मेपर्यंत होणार नसून त्यानंतर लगेच पावसाळा सुरू होणार आहे. पावसाळ्यात निवडणूका होत नसल्याने दिवाळीनंतर पावसाळा संपल्यावर आता जिल्हा बँकेसह ज्ञानेश्वर, मूळा आणि वृध्देश्वर साखर कारखान्यांच्या निवडणुका होणार आहेत.

हे सुद्धा वाचा :  जवळा परिसराला वादळाचा तडाखा..

श्रीरामपुरातील सोसायट्यांची निवडणूक पुढे ढकलली
जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील 3 ब वर्ग विविध कार्यकारी विकास सोसायट्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम लावण्याच्या हालचाली जिल्हा सहाकर विभागाने सुरू केल्या होत्या. मात्र, राज्य सहकार निवडणूक प्राधिकरण यांनी नगर जिल्ह्यातील ब वर्ग व क वर्गातील संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचे आदेश दिल्याने या सोसायट्यांच्या निवडणुका आता दिवाळीनंतरच होणार आहे.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ