- जाहिरात -spot_img
breaking news

कान्हूर पठार १६ गावे पाणी योजनेचा वनवास संपणार, काय म्हणाले पहा

पिंपळगाव जोगा कालव्यालगत नवीन उद्भव निश्चित
पारनेर | नगर सह्याद्री
कान्हूर पठार परिसरातील १६ गावांच्या पाणीपुरवठा योजनेसाठी एक महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. मांडओहळ धरणातील पाण्याची अनिश्चितता लक्षात घेता, आता या योजनेचा मुख्य ‘उद्भव’ बदलून तो पिंपळगाव जोगा कालव्यालगत स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव निश्चित करण्यात आला आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पत्राद्वारे हा विषय मांडल्याने योजनेच्या सक्षमीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

कान्हूर पठार भागासाठी ही योजना जीवनवाहिनी असली तरी, उन्हाळ्यात मांडओहळ धरणातील पाणीसाठा तळाला गेल्याने योजना वारंवार ठप्प होत होती. शासनाने या योजनेच्या दुरुस्तीसाठी ३८ कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर केला आहे. मात्र, जोपर्यंत पाण्याचा शाश्वत स्त्रोत बदलला जात नाही, तोपर्यंत हा निधी खर्च करणे निष्फळ ठरेल, अशी भीती व्यक्त केली जात होती. ही तांत्रिक अडचण आ. काशिनाथ दाते आणि भाजपा नेते विश्वनाथ कोरडे यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिली होती.

या पाठपुराव्याची दखल घेत जीवन प्राधिकरणाने पिंपळगाव जोगा कालव्यालगतच्या जागांची पाहणी केली आहे. नवीन प्रस्तावानुसार, कालव्यालगत साठवण तलाव निर्माण करून त्यात कॅनॉलद्वारे पाणी सोडले जाईल, जेथून १६ गावांना नियमित पाणीपुरवठा करणे शय होईल. यामुळे उन्हाळ्यातील टंचाईवर कायमस्वरूपी मात करता येणार आहे. नुकतेच या संदर्भातील मागणीचे पत्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंत्यांना सुपूर्द करण्यात आले. या निर्णयामुळे पठार भागातील ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

लवकरच योजना कार्यान्वित होणार
कान्हूरपठार भागातील १६ गावांच्या पाणी योजनेचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा, हाच आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. केवळ निधी मिळवून चालणार नाही, तर पाण्याचा स्त्रोत शाश्वत असणे गरजेचे होते. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारामुळे आणि पत्रव्यवहारामुळे ‘उद्भव’ बदलण्याची तांत्रिक अडचण आता दूर झाली आहे. लवकरच ही योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होऊन ग्रामस्थांना दिलासा मिळेल.
– विश्वनाथ कोरडे, भाजपा नेते

हे सुद्धा वाचा :  नवीपेठेतील श्रीराम मंदिरात श्रीराम जन्मोत्सव उत्साहात
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ