- जाहिरात -spot_img
breaking news

दैनिक नगर सह्याद्रीच्या कार्यकारी संपादकपदी सुनील चोभे, निवासी संपादकपदी मुरलीधर तांबडे

अहिल्यानगर | नगर सह्याद्री
जिल्ह्यातील लोकप्रिय दैनिक नगर सह्याद्रीच्या कार्यकारी संपादकपदी सुनील चोभे यांची तर निवासी संपादकपदी मुरलीधर तांबडे यांची नियुक्ती करण्यात आली. संस्थापक मुख्य संपादक शिवाजी शिर्के यांनी या निवडीची घोषणा करत दोघांचा सत्कार करत शुभेच्छा दिल्या.

सुनील चोभे हे गेल्या 13 वर्षांपासून नगर सह्याद्री वृत्तपत्रामध्ये कार्यरत आहे. सुरुवातीला शहर प्रतिनिधी, उपसंपादक पदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडल्यानंतर त्यांच्यावर निवासी संपादकाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. ही जबाबदारी यशस्वीपणे सांभाळल्यानंतर त्यांना पदोन्नती देण्यात आली. कार्यकारी संपादकपदी त्यांची निवड करण्यात आली.

ज्येष्ठ पत्रकार मुरलीधर तांबडे यांनी यापूर्वी विविध आघाडीच्या दैनिकांत काम केले आहे. उपसंपादक पदापासून त्यांनी कामाला प्रारंभ केल्यानंतर 20 वर्षांपासून ते वृत्तपत्र क्षेत्रात कार्यरत आहे. सामाजिक व राजकीय पत्रकारिता हा त्यांच्या पत्रकारितेचा आवडता विषय आहे. नुकतेच ते नगर सह्याद्री परिवारात सहभागी झाले असून, त्यांची निवासी संपादकपदी नियुक्ती करण्यात आली.

संस्थापक संपादक शिवाजी शिर्के यांनी कार्यकारी संपादक सुनील चोभे व निवासी संपादक मुरलीधर तांबडे यांचा शाल, बुके देऊन सत्कार केला. व्यवस्थापक सुनील नाईकवाडी, ज्येष्ठ पत्रकार प्र. के. कुलकर्णी, एकनाथ मोरे, एडिटर नौशाद इनामदार, कुलदीप कांबळे, मंगेश थोरात, अनिकेत आरडे यांच्यासह नगर सह्याद्री परिवारातील सदस्य यावेळी उपस्थित होते.

 

हे सुद्धा वाचा :  संत निवृत्तिनाथ महाराज पालखी सोहळा शनिवारी अहिल्यानगर शहरात
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ