- जाहिरात -spot_img
breaking news

आम्ही लग्न करतोय’; आमिर खानने गौरी स्प्रॅटसोबतच्या लग्नाची सांगितली तारीख!

मुंबई / नगर सह्याद्री :
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आमिर खान याच्या तिसऱ्या लग्नाबाबत गेल्या काही दिवसांपासून अनेक चर्चा सुरू होत्या. आमिर त्याची मैत्रीण गौरी स्प्रॅट हिच्यासोबत लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. मात्र या चर्चांवर आमिर किंवा गौरी यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली नव्हती. आता मात्र स्वतः आमिर खानने या वृत्ताला दुजोरा देत आपल्या लग्नाची घोषणा केली आहे.

एका मुलाखतीदरम्यान आमिर खानने सांगितले की, तो ५ जुलै २०२६ रोजी गौरी स्प्रॅटसोबत विवाह करणार आहे. हा विवाह सोहळा अत्यंत खासगी पद्धतीने पार पडणार असून त्यामध्ये कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित राहतील.

सध्या ६१ वर्षांचा असलेला आमिर खान आणि ४७ वर्षांची गौरी स्प्रॅट गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. गेल्या वर्षी आमिरने आपल्या आणि गौरीच्या नात्याबद्दल सार्वजनिकरित्या कबुली दिली होती. त्यानंतर दोघे अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसले. आता त्यांनी आपल्या नात्याला लग्नाच्या रूपात पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे.

आमिरने यावर्षी मार्च महिन्यात त्याच्या वाढदिवसानिमित्त गौरीची ओळख माध्यमांशी करून दिली होती. त्यावेळी तिला आपली मैत्रीण असल्याचे त्याने सांगितले होते. त्या वेळी लग्नाबाबत कोणताही निर्णय घेतलेला नसल्याचे त्याने स्पष्ट केले होते. मात्र आता त्याने स्वतः लग्नाची तारीख जाहीर केल्याने चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गौरी स्प्रॅट मूळची बंगळुरूची आहे. ती एका अँग्लो-इंडियन कुटुंबातून येते. तिचे वडील तमिळ-ब्रिटिश तर आई पंजाबी-आयरिश वंशाची आहे. विविध सांस्कृतिक पार्श्वभूमी असूनही गौरी स्वतःची ओळख भारतीय म्हणूनच करून देते. तिचे कुटुंब शिक्षण आणि सामाजिक मूल्यांना महत्त्व देणारे मानले जाते.

व्यावसायिक आयुष्यात गौरी व्यवसाय व्यवस्थापन आणि फॅशन क्षेत्राशी संबंधित आहे. तिने बंगळुरूमधील शाळेत शिक्षण घेतल्यानंतर फॅशन आणि डिझाइनशी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण केला. तसेच लंडनमधील एका प्रतिष्ठित संस्थेतून स्टायलिंग आणि फोटोग्राफीचे शिक्षण घेतले आहे. सध्या ती आमिर खानच्या प्रॉडक्शन हाऊसशी संबंधित काही कामांमध्येही सहभागी असल्याचे सांगितले जाते.

हे सुद्धा वाचा :  ‘मी माझ्या नवऱ्यापेक्षा जास्त कमावते’; सोनाली कुलकर्णींचं स्पष्ट वक्तव्य

गौरीला प्रसिद्धीच्या झोतात राहणे फारसे आवडत नाही. त्यामुळे ती सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये फार कमी वेळा दिसते. चित्रपटसृष्टीतील चकाकी आणि ग्लॅमरपासून दूर राहून स्वतःच्या व्यावसायिक आयुष्यावर लक्ष केंद्रित करणे तिला अधिक पसंत आहे.

आमिर खानच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास, हे त्याचे तिसरे लग्न असणार आहे. १९८६ मध्ये त्याने रीना दत्ता यांच्याशी विवाह केला होता. त्यानंतर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. पुढे २००५ मध्ये त्याने किरण राव यांच्याशी लग्न केले. मात्र २०२१ मध्ये दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतरही आमिर आणि किरण मैत्रीपूर्ण नाते जपत विविध प्रकल्पांवर एकत्र काम करत आहेत.

आता आयुष्याच्या नव्या टप्प्यात प्रवेश करताना आमिर खान आणि गौरी स्प्रॅट यांचे लग्न बॉलिवूडमधील चर्चेचा विषय ठरले आहे. चाहत्यांसह चित्रपटसृष्टीतील अनेकजण या नव्या प्रवासासाठी त्यांना शुभेच्छा देत आहेत. ५ जुलै रोजी होणाऱ्या या विवाह सोहळ्याकडे संपूर्ण मनोरंजन विश्वाचे लक्ष लागले आहे.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ