अहिल्यानगर | नगर सह्याद्री
शहरासह केडगावात सुमारे तासभर वादळी पाऊस झाला. जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या विजेच्या तारांवर तुटून पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला. जोरदार पावसाने रस्त्यावरून पाणी वाहत होते.
यापूव 31 मे रोजी झालेल्या वादळी पावसाने शहरात नुकसान झाले होते. जून महिना सुरू झाल्यानंतर पहिल्याच मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. दिवसभर उन्हाच्या कडाक्यानंतर रात्री विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाला सुरुवात झाली. वादळी वारे व जोरदार पावसाने रस्त्यावरून पाणी वाहण्यास सुरुवात झाली. वादळी पावसाने नेहमी प्रमाणे वीज गायब झाली. काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तारांवर तुटून पडल्या. वादळाने फ्लेक्स उडून गेले. काही ठिकाणी पडघड झाली.
केडगावाचा निम्मा भाग रात्रीपर्यंत अंधारात होता. नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. उकाडा व त्यात वीज नसल्याने अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. केडगाव सबस्टेशनमधून व्हीआरडीईकडे गेलेल्या लाईनमध्ये बिघाड झाल्याने शास्त्रीनगर, मोहिनीनगर, इंदिरागनर, ताराबाग कॉलनी परिसर अंधारात होता.थोडा जरी पाऊस झाला तरी लाईट जात असून, विजेच्या लपंडावामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.










