- जाहिरात -spot_img
breaking news

मुलींची छेडछाड करणार्‍या चौघा तरुणांना बेड्या; २७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी

कान्हूरपठार येथील प्रकरण

पारनेर | नगर सह्याद्री

तालुक्यातील कान्हूर पठार येथे अल्पवयीन मुलींची छेडछाड करून अत्याचाराचा गंभीर गुन्हा करणार्‍या चार नराधमांना जेरबंद करण्यात पारनेर पोलिसांना यश आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण तालुयात खळबळ उडाली असून, पीडित मुलींच्या पालकांमध्ये भीतीचे वातावरण होते. मात्र, पोलिसांनी अत्यंत शिताफीने तपास करून फरार असलेल्या चारही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

कान्हूर पठार येथील विशाल अनिल हुलावळे, प्रथमेश शंकर लोंढे, वैभव पोपट लोंढे आणि रोहित संजय चत्तर या चौघांनी अल्पवयीन मुलींशी अश्लील वर्तन करत त्यांची छेडछाड केली होती. याप्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून हे चौघेही आरोपी फरार झाले होते. पोलीस त्यांचा कसून शोध घेत होते. दि. २३ मार्च रोजी पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, हे चारही आरोपी पारनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीतच एका गुप्त ठिकाणी लपून बसले आहेत.

माहितीची खातरजमा होताच, पोलीस निरीक्षक खेडकर यांनी तातडीने तपास अधिकारी रणजीत मारग आणि डीबी पथकाला पाचारण केले. या पथकाने रात्रीच्या सुमारास सापळा रचून विशाल हुलावळे, प्रथमेश लोंढे, वैभव लोंढे आणि रोहित चत्तर या चौघांना ताब्यात घेतले. रात्री ११.२५ च्या सुमारास त्यांना अटक करण्यात आली. या पथकात पोलीय निरीक्षक संतोष खेडकर, रणजीत मारग, पी. आर. कांबळे, के. एन. लगड, ए. जी. धामणे, एस. बी. वाघ, डोंगरे, देविदास अकोलकर, जगदीश बुधवंत आणि एस. एस. शिंदे यांचा समावेश होता.

अटकेत असलेल्या या आरोपींना २४ मार्च रोजी अहिल्यानगर येथील विशेष न्यायाधीश, जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्व आरोपींना २७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या आरोपींनी यापूर्वी अशा प्रकारचे इतर काही गुन्हे केले आहेत का, याचा तपास आता पोलीस करत असून लवकरच या प्रकरणाचा सविस्तर उलगडा होण्याची शयता आहे.

हे सुद्धा वाचा :  जामखेडला दोन महिने पुरणार पाणी...नेमकं काय झाल
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ