- जाहिरात -spot_img
breaking news

फ्लेस वाद तापला; आमदार-खासदारांची नावे का टाळली?, प्रोटोकॉलवरून गोलेकरांचा प्रशासनावर हल्लाबोल

जामखेड | नगर सह्याद्री

खर्डा येथे आयोजित ’छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरा’च्या फ्लेस, निमंत्रण पत्रिका आणि सोशल मीडियावरील जाहिरातींमध्ये अधिकार्‍यांची नावे छापण्यात आली, मात्र आ.रोहित पवार आणि खा. नीलेश लंके यांचा नामोल्लेख नसल्याने वाद निर्माण झाला आहे. प्रोटोकॉल कोणी मोडला आणि अधिकार्‍यांवर कोणाचा दबाव होता का, असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर यांनी प्रशासनावर हल्लाबोल केला आहे.

जामखेड तालुयातील खर्डा येथील श्री क्षेत्र सिताराम गड येथे शिबीर आयोजित करण्यात आले होते. सकाळी नऊ वाजता सुरू झालेल्या या शिबिराला दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर यांनी भेट दिली. त्यावेळी कार्यक्रमस्थळी लावलेल्या फ्लेसवर आ.रोहित पवार तसेच खा. नीलेश लंके यांचा फोटो अथवा नाव कुठेही नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

तसेच या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिका आणि सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आलेल्या जाहिरातींमध्येही या दोन्ही लोकप्रतिनिधींचा साधा नामोल्लेख नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींना जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, कार्यक्रमस्थळी लावलेल्या फ्लेसवर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे फोटो छापण्यात आले होते. तसेच शिबिराचे उद्घाटक म्हणून सभापती प्रा. राम शिंदे यांचे नाव नमूद करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या संयोजकांमध्ये जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी, निवासी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी तसेच कर्जत व जामखेडचे तहसीलदार यांची नावे नमूद करण्यात आली होती.

राजशिष्टाचारानुसार कोणत्याही शासकीय कार्यक्रमात संबंधित मतदारसंघातील स्थानिक आमदार तसेच लोकसभा मतदारसंघाच्या खासदारांची नावे आणि फोटो समाविष्ट करणे अपेक्षित असते. मात्र या कार्यक्रमात तो प्रोटोकॉल पाळण्यात आला नसल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

प्रशासनाने हा प्रोटोकॉल का पाळला नाही? अधिकार्‍यांवर कोणाचा दबाव होता का? सर्व अधिकार्‍यांची नावे फ्लेसवर छापल्यानंतर आमदार आणि खासदारांचे नाव टाकणे कसे राहून गेले? हा कार्यक्रम सत्ताधार्‍यांचा प्रचार करण्यासाठी आहे की सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी? असे सवालही विजयसिंह गोलेकर यांनी उपस्थित केलेया संपूर्ण प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने तत्काळ स्पष्टीकरण द्यावे, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

हे सुद्धा वाचा :  आमदार दाते यांच्यावर केलेले आरोप बिनबुडाचे ; रोहिदास लामखडे
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ