- जाहिरात -spot_img
breaking news

राज्यात टायगर एक्स्प्रेस सुसाट; शरद पवार अन् काँग्रेसला मोठा धक्का, काय घडलं पहा…

अकोला / नगर सह्याद्री –
जिल्ह्यातील बार्शीटाकळी नगरपंचायत आणि अकोट नगरपालिकेतील सुमारे 15 हून अधिक नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. कॉँग्रेस, शरद पवार गट तसेच काही अपक्ष नगरसेवक शिंदेसेनेत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. दरम्यान बार्शीटाकळी नगरपंचायतीचे अनेक नगरसेवक आज मुंबईकडे रवाना झाले असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडणार असल्याचे सांगितले जात आहे. या घडामोडींमुळे जिल्ह्यातील स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

याच पार्श्वभूमीवर मूर्तीजापुरचे भाजप आमदार हरिश पिंपळे आणि शिंदेसेनेचे विदर्भातील प्रवक्ते प्रकाश डवले यांच्यातील एक व्हिडिओ समोर आला आहे. नगरसेवकांच्या पक्षप्रवेशावरून दोन्ही नेत्यांमध्ये मिश्किल टोलेबाजी देखील झाली. भाजप आमदार पिंपळे यांनी जे नगरसेवक आमच्या कामाचे नाहीत, त्यांनाही तुम्ही घेऊन टाका, असा चिमटा काढला. त्यावर प्रकाश डवले यांनीही हलक्याफुलक्या अंदाजात उत्तर देत, आमच्याकडे नंदनवन येथे नगरसेवकांच्या प्रवेशासाठी मोठी गर्दी आहे, अनेक जण वेटिंगवर आहेत, असे सांगितले. या संवादादरम्यान उपस्थितांमध्ये एकच हशा पिकल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान, या सर्व घडामोडींमुळे अकोला जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे स्पष्ट दिसत असून, आगामी काळात आणखी मोठे राजकीय फेरबदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हे सुद्धा वाचा :  देवस्थान जमिनींबाबतचा सरकारचा मोठा निर्णय, काय म्हटलेय पहा...
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ