- जाहिरात -spot_img
breaking news

अहिल्यानगरमध्ये ठाकरे सेनेला धक्का, जिल्हाप्रमुखाचा जय महाराष्ट्र

शिवेसना शिंदेसेनेत प्रवेश
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
जिल्ह्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे यांनी रविवारी मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे अहिल्यानगरमध्ये ठाकरे गटाला जिल्ह्यात आणखी एक धक्का बसला आहे.

जिल्हाध्यक्षपदावरून हटविल्यानंतर रावसाहेब खेवरे हे पक्ष नेतृत्वावर नाराज असल्याचे बोलले जात होते. गेल्या काही महिन्यांपासून ते पक्षाच्या कार्यक्रमांपासून काहीसे दूर होते.

रावसाहेब खेवरे यांनी अलिकडेच राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक लढवून आपली राजकीय ताकद दाखवून दिली होती. राहुरी तालुक्यासह शिड लोकसभा मतदारसंघातील काही भागात त्यांचा स्वतंत्र जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांचे जाळे असल्याचे मानले जाते. त्यामुळे त्यांच्या पक्षांतराला स्थानिक राजकारणात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. शिडचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी रावसाहेब खेवरे यांना शिंदे गटात आणण्यासाठी विशेष पुढाकार घेतला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तसेच पुढील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खेवरे यांचे संघटन कौशल्य आणि स्थानिक प्रभाव शिंदे गटासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे मानले जात आहे.रविवारी मुंबई येथे होणाऱ्या पक्षप्रवेश सोहळ्यानंतर रावसाहेब खेवरे यांना शिंदे शिवसेनेत कोणती जबाबदारी दिली जाते, याकडे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा :  नाफेडमार्फत राज्यभर समान दराने कांदा खरेदी करा - सभापती गंगाराम बेलकर
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ