- जाहिरात -spot_img
breaking news

अखेर कियाराने मौन सोडलं; दोनच शब्दांची पोस्ट शेअर करत म्हणाली…

मुंबई / नगर सह्याद्री :

बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणी सध्या तिच्या आगामी ‘टॉक्सिक : अ फेरी टेल फॉर ग्रोन अप्स’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेता यशसोबत ती स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.

या चित्रपटात यशसोबत कियाराने इन्टिमेट सीन शूट करून त्यानंतर ते हटवण्याची मागणी केली असल्याची चर्चा होती. या चर्चांवर आता कियारा चांगलीच भडकली असून तिने सोशल मीडियावर दोन शब्दांत पोस्ट लिहित चर्चांना पूर्णविराम देत संताप व्यक्त केला आहे.

कियाराने सोशल मीडियावर एका बातमीचा स्क्रीनशॉट शेअर करत बोल्ड सीन हटवण्याबाबतच्या चर्चांना “Absolute Nonsense” असे म्हणत स्पष्टपणे नाकारले आहे.
खरंतर टॉक्सिक चित्रपटाच्या टीझरमधील एका बोल्ड सीनवरून यापूर्वीही मोठा वाद निर्माण झाला होता. एका कारमधील इन्टिमेट सीनवरून वाद निर्माण झाल्याचे सांगितले जाते. काही दिवसांपूर्वी आलेल्या बातम्यांनुसार, कियाराने यशसोबत एक बोल्ड रोमँटिक सीन शूट केला होता, असे सांगण्यात आले होते.

दिग्दर्शकांनी तो सीन तिच्या कम्फर्ट झोनमध्ये राहून शूट केला जाईल, असं आश्वासन तिला दिलं होतं. मात्र अंतिम आउटपुट पाहिल्यानंतर कियारा या सीनबाबत पुन्हा विचार करत असल्याचं समोर आल्याच्या अफवा होत्या.

हा चित्रपट यंदाच्या बहुचर्चित प्रोजेक्ट्सपैकी एक मानला जात असून, वैयक्तिक आयुष्यात आई झाल्यानंतरचा कियाराचा हा पहिलाच चित्रपट आहे. त्यामुळे चाहत्यांमध्येही मोठी उत्सुकता आहे.

या चित्रपटाच्या रिलीज डेटमध्ये वारंवार बदल होत असल्याने विविध चर्चा रंगल्या आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन गीतू मोहनदास यांनी केले असून यश हा या चित्रपटात मुख्य अभिनेत्यासह निर्माता देखील आहे. ‘टॉक्सिक’ची नवीन रिलीज डेट अद्याप जाहीर झालेली नाही. त्यामुळे टॅाक्सिक नक्की कधी रिलीज होणार या प्रतिक्षेत चाहते आहेत. याशिवाय यश त्याच्या आगामी रामायणा चित्रपटातील रावणाच्या भूमिकेसाठी चर्चेत आहे.

हे सुद्धा वाचा :  रेकॅार्ड ब्रेक! धुरंधर 2 ने एकाच दिवसात ओलांडला 100 कोटींचा टप्पा
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ