- जाहिरात -spot_img
breaking news

सकाळी रिकाम्यापोटी केळं की खजूर खाणे आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर, जाणून घ्या

बदलत्या जीवनशैलीत निरोगी शरीर राखण्यासाठी आपण विविध प्रकारचे पदार्थ खातो जे पौष्टिकतेचे भांडार मानले जातात. केळी आणि खजूर हे त्यापैकीच एक आहेत. परंतु कधीकधी आपल्यापैकी अनेकजण सकाळी उठल्यावर चहा किंवा कॉफीचे सेवन करतात. पण तज्ञांचा सल्ल्यानुसार जर तुम्ही सकाळची सुरूवात योग्य अन्नाने केली तर तुमची पचनसंस्था सुरळीत चालते. त्यामुळे तुम्हीही सकाळची सुरूवात ही फळं खाऊन केली पाहिजे. अशातच सकाळी रिकाम्या पोटी केळी खाणे की खजूर खाणे अधिक फायदेशीर आहे. पण सकाळी केळ्याचे आणि खजूराचे सेवन करणे फायदेशीर आहे की नाही याबद्दल बरेचजण गोंधळून जातात. जर तुम्हालाही या प्रश्नाचे उत्तर हवे असेल तर विलंब न करता आजच्या लेखात आपण केळी आणि खजूर दोन्हीही पोषणाचे फायदे आणि सकाळी रिकाम्या पोटी काय खावे ते जाणून घेऊयात.

रिकाम्या पोटी केळं खाण्याचे फायदे-
केळी हे जगभरात मोठ्या प्रमाणात सेवन केले जाणारे आणि आवडते फळ आहे. त्यात पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी6, व्हिटॅमिन सी आणि फायबरसह असंख्य पोषक घटक असल्याने ते शरीराला असंख्य फायदे देऊ शकतात. केळी हा एक उत्तम नाश्ता मानला जातो.

खजूर खाण्याचे फायदे-
खजूर हे आरोग्याचा खजिना मानले जाते कारण त्यात फायबर, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह, अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन बी6 सारखे गुणधर्म असतात, जे शरीराला अनेक आरोग्य समस्यांपासून वाचवण्यास आणि ऊर्जा वाढविण्यास मदत करतात. खजूर अनेक प्रकारे आहारात समाविष्ट केले जाऊ शकतात, परंतु दुधासोबत त्यांचे सेवन करणे सर्वोत्तम मानले जाते.

खजूर की केळी, कोणते खाणे जास्त फायदेशीर आहे?
जर तुम्हाला पोटाच्या समस्या असतील तर रिकाम्या पोटी केळी खाणे टाळा. त्याऐवजी तुम्ही खजूर खाऊ शकता.
त्यातच तुम्हाला तुमचे वजन वाढवायचे असेल तर केळी आणि खजूर दोन्ही खाणे फायदेशीर ठरू शकते.
ज्या लोकांना पचनाच्या समस्या आहेत त्यांनी रिकाम्या पोटी खजूर खावेत.

हे सुद्धा वाचा :    आणे-नांदूर पठार मार्गासाठी ग्रामस्थांचे आ. सोनवणेंना साकडे

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ