- जाहिरात -spot_img
breaking news

‘सकाळी उठल्यावर कोणाला मिठी मारू?’; आशा भोसले यांच्या आठवणीत जनाई भावूक

मुंबई – भारतीय संगीतसृष्टीतील दिग्गज गायिका आशा भोसले यांच्या निधनाने संपूर्ण देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या जाण्याने कलाविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. रविवारी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. सोमवारी शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आशाजींना अखेरचा निरोप देताना अनेकांचे डोळे पाणावले होते.

विशेषतः त्यांची नात जनाई भोसले हिला आजीचा निरोप घेणं अत्यंत जड गेलं. आजीच्या आठवणींनी ती व्याकूळ झाली होती. अंत्यसंस्कारानंतर जनाईने इन्स्टाग्रामवर एक भावनिक स्टोरी शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या, ज्याने सर्वांच्याच मनाला स्पर्श केला.
जनाईने आजीसोबतचा दिल चीज क्या है हे गाण गातानाचा एक खास व्हिडिओ शेअर करत लिहिलं की, आज सकाळी जाग आल्यावर मला जाणीव झाली की, मी माझी ‘गुन्ह्यातील साथीदार’ (partner in crime), माझी सर्वात जवळची मैत्रीण अशी व्यक्ती जिने माझे संपूर्ण जग पूर्ण केले होते आणि जिने माझ्या जन्मानंतर मला सर्वात आधी आपल्या कुशीत घेतले होते तिला गमावले आहे. आता मी काय करू? सकाळी उठल्यावर मी कोणाला मिठी मारायची आणि कोणासोबत चहा प्यायचा? मी घरी परतल्यावर रोज माझी वाट कोण पाहणार, कोणासोबत मी ते माझे बालिश विनोद करत बसणार? तिची आठवण काढण्यासाठी या काही मोजक्याच गोष्टी आहेत. पण ज्यांनी माझ्यासोबत हे दुःख अनुभवले आहे, त्या सर्वांनी हे लक्षात ठेवा की ती म्हणजे ‘आयुष्य’ आणि ‘हास्य’ यांचीच सुंदर मूर्ती आहे. त्यामुळे, जर तुम्हाला तिची आठवण काढायचीच असेल, तर आनंदाच्या स्वरूपात तिची आठवण काढा.

जनाईने पुढे लिहीले, मला खात्री आहे की ती लवकरच माझ्याकडे परत येईल. कारण तिने मला तसे वचन दिले होते. मी माझ्या आयुष्यातले माझे प्रेम गमावले आहे आणि या जगात यापेक्षा मोठे दुःख दुसरे कोणतेही नाही. म्हणूनच, मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो की, आपले आयुष्य भरभरून जगा; तिच्या स्मृतीचा सन्मान करण्याचा हाच सर्वोत्तम मार्ग आहे. आई, माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. तूर्तास तुझा निरोप घेतो. मला माहित आहे की, काहीही झाले तरी तू नेहमीच माझ्यासोबत असणार आहेस; मी फक्त तुझी वाट पाहत आहे की तू पुन्हा माझ्याकडे परत येशील आणि मला एकदा मिठी मारशील.

हे सुद्धा वाचा :  भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण; अभिनेत्री ममता कुलकर्णी यांच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला फुटले तोंड
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ