- जाहिरात -spot_img
breaking news

आयुक्त तुकाराम मुंडेंचा दणका; नाशिक विभागातील ९ हॉटेल्सचे परवाने निलंबित

नाशिक | नगर सह्याद्री –
अन्न व औषध प्रशासन विभागाने राज्यभर सुरू केलेल्या विशेष तपासणी मोहिमेत नाशिक विभागाने दोन दिवसांत २० हॉटेल व खाद्य आस्थापनांची तपासणी करत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ९ आस्थापनांवर कारवाई केली. यापैकी सात आस्थापनांचे परवाने तपासणीदरम्यान तत्काळ निलंबित करण्यात आले, तर सुधारणा नोटीसचे पालन न केल्याने आणखी दोन आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले.

राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली १ व २ जुलै रोजी नाशिक विभागात ही विशेष मोहीम राबविण्यात आली. तपासणीदरम्यान स्वयंपाकघरातील गंभीर अस्वच्छता, निकृष्ट शीतकरण व्यवस्था, उघड्यावर ठेवलेले कच्चे अन्न, कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक स्वच्छतेचा अभाव, आवश्यक कागदपत्रे व वैद्यकीय तपासणी नसणे, तसेच अन्न सुरक्षा नियमांचे विविध उल्लंघन आढळून आले. या कारवाईत नाशिकमधील पंचवटी, द्वारका, पेठरोड तर सिन्नर, जळगाव तसेच नंदुरबार येथील रेस्टॉरंट यांचे अन्न व्यवसाय परवाने तत्काळ निलंबित करण्यात आले.

याशिवाय, पूर्वी देण्यात आलेल्या सुधारणा नोटिशीतील त्रुटी निर्धारित मुदतीत दूर न केल्याने भुसावळ आणि धुळे येथील कॅन्टीनचे परवानेही निलंबित करण्यात आले. चार तपासणीदरम्यान आस्थापनांकडे वैध अन्न व्यवसाय नोंदणी अथवा परवाना नसल्याचे आढळून आल्याने आवश्यक नोंदणी किंवा परवाना मिळेपर्यंत त्यांचा अन्न व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. अन्न व औषध प्रशासन विभागाने अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा दिला आहे.

हे सुद्धा वाचा :  शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कृषिमंत्र्यांनी कर्जमाफीची थेट तारीखच सांगितली
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ