- जाहिरात -spot_img
breaking news

तुकाराम मुंढेंचा धसका; टपऱ्यांवरून गुटखा गायब, काय आहे वस्तुस्थिती पहा…

पारनेर | नगर सह्याद्री
राज्याच्या प्रशासकीय वर्तुळात अत्यंत शिस्तप्रिय आणि कठोर अधिकारी म्हणून ओळख असलेल्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारताच त्याचा धसका अवैध धंदे चालकांनी घेतला आहे. याचाच प्रत्यय पारनेर तालुक्यात आला असून, गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील पान टपऱ्या आणि किरकोळ विक्रीच्या ठिकाणांवरून गुटखा आणि प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री अचानक बंद झाली आहे.

एकेकाळी पारनेरच्या मुख्य बाजारपेठेत, बसस्थानक परिसर आणि ग्रामीण भागातील टपऱ्यांवर सहज उपलब्ध होणारा गुटखा आता गायब झाला आहे. अनेक टपरीचालकांनी धाडीच्या भीतीने गुटख्याचा साठा करणे पूर्णपणे थांबवले आहे. तुकाराम मुंढे यांनी आपल्या कारकीदत नेहमीच नियमांची कडक  अंमलबजावणी केली आहे. त्यांच्या कार्यपद्धतीची माहिती असल्याने, कारवाईच्या भीतीने विक्रेत्यांनी ‌’सावध‌’ पवित्रा घेतला आहे. पूव काही टपऱ्यांवर छुप्या पद्धतीने गुटख्याची विक्री सुरू होती. मात्र, मुंढे यांच्या धडाकेबाज कामकाजाच्या चर्चेने विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाकडून कोणत्याही क्षणी कडक कारवाई होऊ शकते, या शक्यतेने व्यावसायिकांनी प्रतिबंधित साठा उघड्यावर ठेवणे टाळले आहे, मुंढे साहेब आले की भ्रष्टाचारी आणि नियम मोडणाऱ्यांचे धाबे दणाणतात.

पारनेरमध्येही गुटखा विक्रेत्यांनी स्वतःहूनच दुकाने रिकामी केली आहेत.दरम्यान, ही परिस्थिती केवळ तात्पुरती राहू नये, तर कायमस्वरूपी असावी, अशी मागणी आरोग्यप्रेमी नागरिकांकडून होत आहे. तरुणाईला विळखा घालणाऱ्या गुटख्याच्या विक्रीवर प्रशासनाचा असाच ‌’वचक‌’ राहिल्यास, तालुक्यात व्यसनमुक्तीच्या दिशेने मोठे पाऊल पडेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नावाचा दरारा आता सर्वसामान्यांपासून ते अवैध व्यावसायिकांपर्यंत पोहोचला असून, याचे सकारात्मक परिणाम पारनेर तालुक्यात दिसत आहेत.

हे सुद्धा वाचा :  मळगंगा देवीच्या यात्रा उत्सवाची तयारी पूर्ण
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ