- जाहिरात -spot_img
breaking news

नगरमध्ये कार चालकाला लुटले; पाथर्डीत स्टेरॉईड औषधांची बेकायदेशीर विक्री; दोन गटांत जोरदार राडा..

पाथर्डी | नगर सह्याद्री
शरीरावर अपायकारक व गुंगीकारक परिणाम करणार्‍या स्टेरॉईड औषधांची बेकायदेशीर विक्री करणार्‍या टोळीवर पाथर्डी पोलिसांनी धडक कारवाई करत एका तरुणाला अटक केली असून दुसरा आरोपी फरार झाला आहे. या कारवाईत सुमारे ६२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पाथर्डी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दि. ४ जून रोजी सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास मोजे करंजी (ता. पाथर्डी) येथे छापा टाकण्यात आला. पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विशाल लहाने, विलास जाधव, पोलिस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर इलग, इजाज सय्यद, संजय जाधव, तांबे, सचिन हाडके, सागर बुधवंत, प्रविण भोजे तसेच औषध निरीक्षक जावेद शेख यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.

या कारवाईत शेरा राजू शेख (रा. इंदिरानगर, पाथर्डी) याला अटक करण्यात आली असून मोहसीन शेख (रा. मुकुंदनगर, जि. अहिल्यानगर) हा आरोपी फरार झाला आहे.
पोलिसांनी आरोपींकडून दोन हजार पाचशे रुपये किमतीच्या मेफेन्टरमाईन सल्फेट नावाचे इंजेशन आयपी (३० एमजी/एमएल) च्या ८० सिलबंद बाटल्या, ५० हजार रुपये किमतीचा पल कंपनीचा आयफोन आणि दहा हजार रुपये किमतीचा विवो फोन असा एकूण ६२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

प्राथमिक तपासात आरोपी डॉटरांच्या सल्ल्याशिवाय व वैध प्रिस्क्रिप्शनशिवाय संबंधित औषधांची विक्री करत असल्याचे समोर आले आहे. ग्राहकांना चुकीची माहिती देऊन ही औषधे विक्रीसाठी साठवून ठेवण्यात आल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पाथर्डी पोलीस स्टेशनच्या पथकाने केली.

नगरमध्ये कार चालकाला लुटले
साईबन परिसरातील घटना | चार अनोळखी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
निंबळक गावाच्या शिवारातील साईबन भागात दोन दुचाकींवरून आलेल्या चार अनोळखी चोरट्यांनी एका कार चालकाला धारदार शस्त्रांचा धाक दाखवून लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चार अज्ञात आरोपींविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सागर सिताराम तळेकर (वय ३९, रा. निर्मलनगर, सत्कार कॉलनी, अहिल्यानगर) हे रात्रीच्या सुमारास निंबळक शिवारातून आपल्या मारुती कारने घराकडे निघाले होते. दरम्यान, दोन विना नंबरच्या स्कुटीवरून आलेल्या चार अनोळखी इसमांनी त्यांची कार अडवली. चोरट्यांनी तळेकर यांना लोखंडी चाकू, कुर्‍हाड, धारदार कटर आणि कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्या जवळील मुद्देमाल बळजबरीने चोरून घेतला.
या लुटीमध्ये चोरट्यांनी फिर्यादीच्या कानातील सोन्याची बाळी, गळ्यातील सोन्याचे बदाम, डिजिटल स्मार्ट घड्याळ आणि रोकड असा एकूण ३० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला. चोरी केल्यानंतर आरोपींनी तळेकर यांना पोलिसात गेल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. या भीतीमुळे फिर्यादीने तात्काळ तक्रार दिली नव्हती, मात्र मनस्थिती सुधारल्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेतली. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी आणि पोलीस उपनिरीक्षक जाधव करत आहेत.

हे सुद्धा वाचा :  कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या सात जनावरांची सुटका; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

बोअरवेलच्या कारणावरून दोन गटांत जोरदार राडा; ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
अहिल्यानगर तालुक्यातील खडकी येथील शेतजमिनीतील जुन्या बोअरवेलमध्ये इलेक्ट्रिक मोटार बसविण्याच्या कारणावरुन दोन गटात वादावादी झाली. तसेच मारहाण करण्यात आली. याप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्याद दाखल केली आहे.

मिरा जिमदार काळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझ्या हिश्यामधील बोअरवेलमध्ये मोटार टाकू नका, असे सांगितल्याचा राग मनात धरून सहा जणांनी मिळून कुटुंबाला बेदम मारहाण केली. हा प्रकार ४ जून २०२६ रोजी दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास गायरान गट नंबर १८१ च्या समाईक बांधावर घडला. या वादादरम्यान आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या बहिणीला शिवीगाळ केली. तसेच मतुमचे तुकडे करून याच बोअरवेलमध्ये टाकून देऊफ, अशी जीवघेणी धमकीही आरोपींनी दिली. आरोपींनी शेतातील सीसीटीव्ही कॅमेरे फोडून आणि बोअरवेल बुजवून टाकून शेतीचे मोठे नुकसान केले आहे. या मारहाणीत जखमी झालेल्यांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात वायसर काळे, जितु काळे, धनु काळे, स्वातिप काळे, शरद काळे आणि प्रियंका काळे यांच्याविरुद्ध मारहाण, तोडफोड आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर दुसरी फिर्याद प्रियंका जितेंद्र काळे यांनी दिली आहे. त्या म्हटले आहे की, खडकी (ता. नगर) येथील गायरान गट नंबर १८१ मधील शिवरस्त्यालगत आम्ही नातेवाईकांसह जुन्या बोअरवेलमध्ये शेतीसाठी लागणारी इलेट्रिक मोटार बसविण्याचे काम करत होता. यावेळी त्याच गावात राहणारे तिथे आले आणि त्यांनी या बोअरवेलमध्ये मोटार बसविण्यास तीव्र विरोध केला. त्यावर ही आमची जुनी बोअरवेल असून आम्ही इथे मोटार टाकणारच, असे सांगितले. याचा राग मनात धरून आरोपींनी वाद घालण्यास सुरुवात केली. शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. बोअरवेलमध्ये पुन्हा मोटार टाकण्याचा प्रयत्न केला, तर तुम्हा सर्वांना जिवंत मारून टाकू, अशी धमकी दिली. याप्रकरणी कल्याण जिमदार काळे, मिरा जिमदार काळे, संदीप पाराजी चव्हाण, छाया किसन भोसले आणि आकाबाई वायशा भोसले (सर्व राहणार खडकी, अहिल्यानगर) या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार खरात हे करत आहेत.

हे सुद्धा वाचा :  टेम्पो चोरणारा आरोपी जेरबंद, असा पकडला आरोपी...

‘मुलांना त्रास का देतो?’ असे विचारल्याने तरुणावर हल्ला; केडगाव येथील घटना
अहिल्यानगर: मुला-मुलीला त्रास का देतो, असे विचारल्याचा राग आल्याने एका तरुणाला आणि त्याच्या आईला शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. शहरातील केडगाव परिसरातील दूधसागर सोसायटी येथे ही घटना घडली असून, मुख्य आरोपीने फिर्यादीच्या डोक्यात लाकडी दांडके मारून त्याला गंभीर जखमी केले आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
​या संदर्भात ओम पोपट गायकवाड या १८ वर्षीय तरुणाने कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी कृष्णा राहुल शिंदे, कविता राहुल शिंदे, सौरभ गोरख वाघ (सर्व राहणार दूधसागर सोसायटी, केडगाव) आणि कल्याण बायपास जवळील टपरी चालक करण (पूर्ण नाव माहिती नाही) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
​दूधसागर सोसायटी परिसरात फिर्यादीची आई आरोपी कृष्णा शिंदे याला ‘तू माझ्या मुलाला आणि मुलीला का त्रास देतोस?’ असे विचारून समजावून सांगत होती. याचा तीव्र राग आल्याने आरोपींनी फिर्यादी आणि त्याच्या आईला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी आरोपींनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या वादात कृष्णा शिंदे याने फिर्यादीच्या डोक्यात लाकडी दांडक्याने प्रहार करून त्याला रक्तबंबाळ केले.
​या घटनेनंतर जखमी तरुणाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांनी रुग्णालयात जाऊन फिर्याद घेतली आणि गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक फौजदार गोल्हार करत आहेत.

केडगावमध्ये भरधाव स्पोर्ट बाईकच्या धडकेत तरुण गंभीर जखमी; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
​अहिल्यानगर: शहर आणि परिसरात वाहनांच्या वाढत्या वेगामुळे अपघातांचे सत्र सुरूच आहे. केडगाव येथील रंगोली हॉटेलसमोरील चौकात एका भरधाव स्पोर्ट बाईकने दिलेल्या जोराच्या धडकेत एक तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात तरुणाचा पाय फ्रॅक्चर झाला असून त्याच्या दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार, आशिष दिलीप भट (वय ३२, रा. लक्ष्मी अपार्टमेंट, दिल्लीगेट, अहिल्यानगर) हे आपल्या मोपेड दुचाकीवरून नेहमीप्रमाणे जेवणाचा डबा देण्यासाठी जात होते. दुपारी दीड वाजेच्या सुमारास ते केडगाव येथील रंगोली हॉटेलसमोरील चौकात आले असता, मागून आलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या भरधाव स्पोर्ट बाईकच्या चालकाने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की आशिष भट हे दुचाकीसह रस्त्यावर कोसळले.
​या अपघातात आशिष यांच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांचा पाय मोडला आहे. अपघात झाल्यानंतर चालक आपली स्पोर्ट बाईक घेऊन घटनास्थळावरून पसार झाला. जखमी आशिष यांना तातडीने उपचारासाठी सिव्हील हॉस्पिटल आणि त्यानंतर पुढील उपचारासाठी मेडिस्टार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
​या घटनेप्रकरणी आशिष भट यांनी दिलेल्या तक्रारीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात स्पोर्ट बाईक चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार भानुदास सोनवणे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात या घटनेचा पुढील तपास करत आहेत. चौकातील सीसीटीव्हीच्या मदतीने पळून गेलेल्या अज्ञात चालकाचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ