अहिल्यानगर | नगर सह्याद्री
मुकुंदनगर येथे कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या ७ गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली. १० लाख ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली.
शहरामध्ये कत्तलखान्याची माहिती काढत असताना गुन्हे शाखेच्या पथकास गुप्त माहिती मिळाली. मुकुंदनगर परिसरात इसरत पार्क शेजारी रोमन वकील यांच्या घोड्याचा तबेला शेजारी पत्र्याचे शेडमध्ये गोवंशीय जनावरे शेडमध्ये डांबून ठेवले असल्याची माहिती मिळताच पथक घटनास्थळी गेले. याठिकाणी दोन वाहनातून गोवंशीय जनावरांची वाहतूक केल्याचे दिसून आले. सालीम समीर कुरेशी, इरफान कुरेशी/इरफान पार्टी दोघे रा. झेंडीगेट, अहिल्यानगर(फरार) यांची ही जनावरे असल्याचे समजले.
या ठिकाणावरून ७० हजार रुपये किमतीचे ७ जनावरे, १० लाख ररुपये किमतीचे एक चार चाकी वाहन व एक आयशर टेम्पो, असा एकूण १० लाख ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीविरुध्द भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.










