मध्यरात्री हिंगोली, परभणी, नांदेडमध्ये भूकंपाचे धक्के|
नांदेड | नगर सह्याद्री
मराठवाडा भूकंपाच्या धक्क्याने हादरला. हिंगोली, परभणी, नांदेड या जिल्ह्यांना मध्यरात्रीपासून ते पहाटेपर्यंत सलग 4 भूकंपाचे धक्के बसले. अचानक जमीन हादरल्यानंतर गाढ झोपेत असलेले नागरिक जागे झाले आणि घाबरून त्यांनी घराबाहेर धाव घेतली. संपूर्ण रात्र सर्वजण घराबाहेरच होते. या भूकंपाच्या धक्क्यामुळे घरांच्या भिंतींना तडे गेले आणि प्लास्टर कोसळले. अजूनही नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना घाबरू नका असे आवाहन केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना मध्यरात्री अवघ्या 40 मिनिटांत सलग चार भूकंपाचे धक्के जाणवले. मध्यरात्री 1 वाजून 37 मिनिटांनी 4.6 रिश्टर स्केलचा पहिला धक्का, त्यानंतर 2 वाजून 15 मिनिटांनी 3.6 रिश्टर स्केलचा आणि 2 वाजून 17 मिनिटांनी 3.9 रिश्टर स्केलचा तिसरा धक्का बसला आणि आखणी एक चौथा धक्का बसला. भूकंपाच्या धक्क्याने सर्वजण प्रचंड घाबरले आणि त्यांनी जीव मुठीत ठेवत घराबाहेर धाव घेतली.
पहिल्या भूकंपाचे केंद्र हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील पांग्रा शिंदे गावाच्या दक्षिणेकडे होते, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या भूकंपाचे केंद्र काकडधाबा गावाजवळ नोंदविण्यात आले. या भूकंपांची खोली 10 किलोमीटर होती. हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यात हे धक्के जाणवले असून काही ठिकाणी घरांच्या भिंतींचे प्लास्टर कोसळल्याच्या तसेच भिंतींना तडे गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
अचानक बसलेल्या धक्क्यांमुळे नागरिक झोपेतून जागे होऊन घराबाहेर धावले. त्यामुळे काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने या भूकंपात कोणतीही जीवितहानी नाही. हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, मध्यरात्रीच्या सुमारास एकूण 4 वेळा भूकंप झाल्याची प्रशासनाने अधिकृत माहिती देत नागरिकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे. प्रशासनाने नागरिकांना घाबरून न जाता अफवांवर विश्वास ठेवू नये, सुरक्षित ठिकाणी राहावे आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले आहे.
हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे हादरे बसल्याने नागरीक भयभीत झाले आहेत. औंढा तालुक्यातील पिंपळदरी आणि वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे गावात नागरिकांनी लहान मुले आणि कुटुंबाला घेऊन अख्खी रात्र जागून काढली. मध्यरात्री अनेक वेळा हे भूकंपाचे हादरे बसल्याने नागरीक रात्रभर झोपलेच नाहीत लातूर येथील भूमापक केंद्रावरती या भूकंपाची 4.2 रिस्टर स्केएर तीव्रता असल्याची नोंद झाली आहे.
दोन तासांत भूकंपाचे चार धक्के
पहिला धक्का बुधवारी मध्यरात्रीनंतर 1 वाजून 37 मिनिटांनी बसला. सिल आणि पाग्रा शिंदे गाव परिसरात नागरिकांना हा हादरा जाणवला. यानंतर पहाटे 2 वाजून 15 मिनिटांनी दुसरा धक्का बसला. या वेळी काकड दाभा गाव परिसर हादरला. अवघ्या दोन मिनिटांनंतर, म्हणजेच पहाटे 2 वाजून 17 मिनिटांनी तिसरा भूकंपाचा धक्का जाणवला. याच काकड दाभा परिसरात पुन्हा एकदा जमीन हादरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर पहाटे 3 वाजून 23 मिनिटांनी सर्वाधिक तीव्र भूकंपाची नोंद झाली. काकड दाभा परिसरात 4.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा धक्का बसल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली.










