- जाहिरात -spot_img
breaking news

पारनेरमध्ये तीन बिबट्यांची दहशत, कुठे काय घडलं पहा

निघोज | नगर सह्याद्री
निघोज परिसरातील तुकाई वस्ती परिसरातील सुरकुंडे वस्ती येथे बुधवारी (दि.22) रात्री आठ वाजता तीन बिबट्यांनी लोकांना एकत्र दर्शन दिल्याने निघोज व परिसरात घबराट पसरली आहे.

गेली अनेक दिवसांपासून निघोज परिसरात बिबट्यांचे वास्तव्य आहे. रामवाडी परिसरात बिबट्याने शेळीचा फडशा पाडत दुसऱ्या दिवशी वासरांवर हल्ला केला आहे. तसेच लंकेवस्ती, बोदगेवाडी, कवाद वस्ती या ठिकाणी बिबटे सातत्याने फिरत आहेत, मात्र मागणी करूनही बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरे उपलब्ध होत नाहीत, अशी ग्रामस्थांची तक्रार आहे.

तुकाई वस्ती परिसर हा दाट लोकवस्तीचा परिसर आहे. जवळच कन्हैया दूध उद्योग समूह आहे. निघोज – शिरुर रस्त्यावर असलेल्या या तुकाई वस्ती परिसरात एकाचवेळी तीन बिबटे दिसल्याने जनतेमध्ये घबराट पसरली आहे. याचा वनसंरक्षक विभागाने त्वरित बंदोबस्त करावा व पिंजरे उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी जनतेतून होत आहे.

हे सुद्धा वाचा :  नफ्याचे आमिष दाखवून शिक्षकाची १ कोटी ३१ लाखांची फसवणूक; काय घडलं पहा...
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ