निघोज | नगर सह्याद्री
दैनिक नगर सह्याद्रीचे संपादक शिवाजीराव शिर्के यांच्या वाढदिवसानिमित्त निघोज जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत संदीप पाटील जनसेवा फौंडेशन व पारनेर तालुका पत्रकार संघ, राज्य मराठी पत्रकार संघ तसेच शिरुर तालुका पत्रकार संघ यांच्या वतीने खाऊ वाटप तसेच शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील वराळ, ज्येष्ठ मार्गदर्शक भास्करराव वराळ पाटील, पारनेर तालुका पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष दत्ता उनवने, शिरुर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय बारहाते, पारनेर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष बाबाजी वाघमारे, पारनेर तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष भास्करराव कवाद, प्रेस फोटोग्राफर जयसिंग हरेल, ग्रामपंचायत सदस्या शबनूर इनामदार, ग्रामपंचायत सदस्या भावनाताई साळवे, ठेकेदार विलासराव हारदे, मुलिका देवी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा संदीप पाटील उद्योग समूहाचे अध्यक्ष आप्पासाहेब वराळ पाटील, आपली माती संस्थेचे अध्यक्ष रुपेश ढवण, अल्पसंख्याक समाजाचे नेते अस्लमभाई इनामदार, पसायदान सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र महाराज सुपेकर, ज्येष्ठ मार्गदर्शक आनंदराव कवाद, सामाजिक कार्यकर्ते देवीदास पवार, तेजस लामखडे, मुख्याध्यापक देठे, ज्येष्ठ शिक्षक शिंदे, साबळे, लंके, लाळगे आदींसह ग्रामस्थ व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
सचिन पाटील वराळ म्हणाले की, नगर सह्याद्रीचे संपादक शिवाजीराव शिर्के यांनी गेली चाळीस वर्षांच्या पत्रकारितेच्या माध्यमातून विकासाभिमुख कामांना पाठबळ दिले असून अहिल्यानगर जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांचे मोठे योगदान आहे. गेली तेरा वर्षात नगर सह्याद्रीने राज्यातील लोकप्रिय दैनिक म्हणून नावलौकिक मिळविला. संदीप पाटील जनसेवा फौंडेशन व पत्रकार संघाच्या माध्यमातून सातत्याने सामाजिक उपक्रम राबविले जातात. संपादक शिर्के यांच्या वाढदिवसानिमित्त जवळपास मराठी शाळेच्या 150 विद्यार्थी व अंगणवाडीचे 20 विद्यार्थी यांना खाऊ व शालेय साहित्याचे वाटप करुन एक अनुकरणीय सामाजिक उपक्रम राबविला.
मुख्याध्यापक देठे म्हणाले की, शिर्के यांनी जिल्ह्याच्या विकासाला पाठबळ देताना जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या विकासासाठी महत्वपूर्ण योगदान दिले असल्याचे गौरवोद्गार त्यांनी व्यक्त केले आहे. यावेळी सर्व शिक्षकांचा सत्कार संदीप पाटील जनसेवा फौंडेशन, पत्रकार संघ व ग्रामस्थ यांच्यावतीने मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक शिंदे, साबळे यांनी केले. पत्रकार संघाचे अध्यक्ष बाबाजी वाघमारे व उपाध्यक्ष भास्करराव कवाद यांनी आभार मानले.










