- जाहिरात -spot_img
breaking news

अहिल्यानगरमध्ये दहशत; विजू पठारेकडून तरुणावर जीवघेणा हल्ला

​अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
शहरातील तोफखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत जुन्या वादातून गुंड विजू पठारे आणि त्याच्या साथीदारांनी एका तरुणावर तलवारी आणि कोयत्याने भीषण हल्ला केला. झेडपी कॉलनीतील पाण्याच्या टाकीजवळ घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी पाच जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, सुनिता भिवषण घोरपडे यांचा मुलगा अविनाश याला भांडण मिटवण्याच्या बहाण्याने बोलावून घेण्यात आले होते. तिथे विजू राजू पठारे याने कोयत्याने, तर अजय राजू पठारे याने तलवारीने अविनाशवर सपासप वार केले. सनी रणजीत चावरे याने लाकडी दांडक्याने मारहाण केली, ज्यामुळे अविनाश गंभीर जखमी होऊन खाली कोसळला. मुलाला वाचवण्यासाठी त्याचे वडील मध्ये पडले असता निलेश ससाणे याने त्यांना लोखंडी रॉडने मारून जखमी केले.

​हा हल्ला इतका क्रूर होता की अविनाशचे हात-पाय मोडले असून तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. आरडाओरड झाल्याने नागरिक मदतीला धावले, तेव्हा आरोपींनी तिथून पळ काढला. या प्रकरणी किरण मोहन जेधिया, सनी चावरे, विजू पठारे, अजय पठारे आणि निलेश ससाणे यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तोफखाना पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी जगदीश भांबळ या घटनेचा पुढील तपास करत असून आरोपींच्या अटकेसाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.

हे सुद्धा वाचा :  अहिल्यानगरमध्ये 41 लाखांची फसवणूक, असा आला उघडकीस प्रकार...जेऊरमध्ये राडा
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ