- जाहिरात -spot_img
breaking news

घरातील कामांची जबाबदारी आणि स्त्री-पुरुष समानतेबाबत प्रियांका चोप्राने मांडले ठाम मत

मुंबई / नगर सह्याद्री :
बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा केवळ अभिनयासाठीच नाही, तर विविध सामाजिक विषयांवर स्पष्ट आणि ठाम मत मांडण्यासाठीही प्रसिद्ध आहे. महिलांचे हक्क, समानता आणि समाजातील बदलत्या विचारांवर ती अनेकदा आपली भूमिका मांडताना दिसते. यावेळी तिने घरातील कामांची जबाबदारी आणि स्त्री-पुरुष समानतेबाबत महत्त्वाचे मत व्यक्त केले आहे.

फ्रान्समध्ये झालेल्या कान्स लायन्स या प्रतिष्ठित कार्यक्रमात बोलताना प्रियांकाने घरातील कामांवरून होणाऱ्या लिंगभेदावर भाष्य केले. तिच्या मते, स्वयंपाक करणे, साफसफाई करणे किंवा घराची देखभाल करणे ही केवळ महिलांची जबाबदारी नाही. ही प्रत्येक जबाबदार व्यक्तीची जबाबदारी आहे. प्रियांका म्हणाली की, आजही अनेक घरांमध्ये स्वयंपाक, धुणी-भांडी, साफसफाई आणि इतर घरकामे मुख्यतः महिलाच करताना दिसतात. समाजात अजूनही ही कामे महिलांचीच आहेत, असा समज अनेक ठिकाणी कायम आहे. मात्र, हा विचार बदलण्याची गरज असल्याचे तिने स्पष्टपणे सांगितले. तिने पुढे सांगितले की, घरातील कामे ही स्त्री किंवा पुरुष यावर ठरत नाहीत. प्रत्येकाने स्वतःच्या घराची आणि कुटुंबाची जबाबदारी समानपणे उचलली पाहिजे. स्त्री-पुरुष असा भेद करून घरातील कामांची विभागणी करणे योग्य नाही.

तसेच घरकाम करण्याचा आळस आणि लिंगभेद या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. त्या एकत्र करून पाहू नयेत, असेही तिने स्पष्ट केले. प्रियांकाच्या या वक्तव्याचे सोशल मीडियावरही अनेकांनी स्वागत केले आहे. अनेकांनी तिच्या मताशी सहमती दर्शवत घरातील जबाबदाऱ्या सर्वांनी मिळून पार पाडल्या पाहिजेत, असे मत व्यक्त केले आहे. याच कार्यक्रमात प्रियांकाने मनोरंजन क्षेत्रातील बदलांवरही भाष्य केले. तिने सांगितले की, पूर्वी चित्रपटसृष्टीत प्रवेश करणे खूप कठीण होते. एखाद्या विशिष्ट क्षेत्रात काम करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत असे. मात्र, आज तंत्रज्ञानामुळे प्रत्येकाला आपली कला दाखवण्याची संधी मिळत आहे. ती म्हणाली की, जर एखादी चांगली कल्पना सुचली तर ती लगेच मोबाईल किंवा कॅमेऱ्यात शूट करा आणि यूट्यूबसारख्या प्लॅटफॉर्मवर अपलोड करा. आज डिजिटल माध्यमांमुळे अनेक नवोदित कलाकार आणि निर्मात्यांना स्वतःची ओळख निर्माण करण्याची संधी मिळत आहे. चांगला आशय असेल तर तो जगभरातील प्रेक्षकांपर्यंत सहज पोहोचू शकतो.

हे सुद्धा वाचा :  बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनचे 'या' चित्रपटाने बदलले आयुष्य..

दरम्यान, प्रियांका चोप्रा सध्या हॉलीवूडमध्येही यशस्वी कारकीर्द घडवत आहे. तिच्या आगामी प्रोजेक्ट्सचीही चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. प्रसिद्ध अभिनेत्री अँजेलिना जोलीसोबत ती एका नव्या प्रोजेक्टमध्ये दिसणार असल्याची चर्चा आहे. तसेच अनेक वर्षांनंतर ती पुन्हा एका मोठ्या बॉलिवूड चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ