- जाहिरात -spot_img
breaking news

नागराज मंजुळे यांच्या ‘खाशाबा’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित; राजकारणातून थेट चित्रपटात…

मुंबई / नगर सह्याद्री –
प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या बहुप्रतीक्षित ‘खाशाबा’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांकडून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. भारताला स्वतंत्र्यानंतर पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे महान कुस्तीपटू खाशाबा दादासाहेब जाधव यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासावर हा चित्रपट आधारित आहे. १ जानेवारी २०२७ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटाचे आणखी एक खास आकर्षण म्हणजे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उपस्थिती. ते या चित्रपटात त्यांच्या हृदयाच्या अत्यंत जवळ असलेल्या एका ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाची भूमिका साकारणार आहेत. ते या चित्रपटात त्यांचे आजोबा शहाजी महाराजांची भूमिका साकारणार आहेत. याबाबत त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत आनंद व्यक्त केला आहे.

संभाजीराजे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “खाशाबा या चित्रपटात माझ्या हृदयाच्या अत्यंत जवळ असणाऱ्या पूजनीय व्यक्तिमत्वाची भूमिका साकारण्याची मला संधी मिळाली. नुकताच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला असुन १ जानेवारी २०२७ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. भारताला ऑलिम्पिक मध्ये पहिले पदक मिळवून देणाऱ्या ऑलिम्पिकवीर पैलवान खाशाबा जाधव यांच्या संघर्षमयी जीवनचरित्रावरील हा चित्रपट असून यामध्ये माझ्या वैयक्तिक आयुष्यात देखील माझ्या हृदयाच्या अत्यंत जवळ असणाऱ्या ऐतिहासिक व्यक्तीमत्वाची भूमिका साकारण्याची संधी मला मिळाली, याचे मला अत्यंत समाधान आहे. सर्वांनी हा टीजर जास्तीतजास्त प्रसारित करावा व आपल्या देशाची मान अभिमानाने उंचावणाऱ्या पैलवान खाशाबा जाधव यांच्या कार्याची माहिती घेण्यासाठी हा चित्रपट अवश्य चित्रपटगृहात जाऊन पाहावा.

या चित्रपटात महेश मांजरेकर, गिरीश कुलकर्णी, जितेंद्र जोशी, संदीप कुलकर्णी, वैभव मांगले, छाया कदम, गार्गी कुलकर्णी, संदेश कुलकर्णी, ओम भूतकर यांच्यासह स्वतः नागराज मंजुळे देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. त्यामुळे चित्रपटाबाबतची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

हे सुद्धा वाचा :  'देऊळ बंद २'नं रचला इतिहास; रितेश देशमुखच्या चित्रपटालाही पछाडलं
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ