- जाहिरात -spot_img
breaking news

रशियन ग्रँड मास्टरचा नगरमध्ये एकाचवेळी 30 खेळाडूंविरुद्ध सामना… नेमकं कारण काय

खुल्या बुद्धिबळ स्पर्धेची रंगणार लढत

अहिल्यानगर | नगर सह्याद्री
शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन प्रायोजित मोतीलालजी फिरोदिया अखिल भारतीय खुली क्लासिकल आंतरराष्ट्रीय मानांकन बुद्धिबळ स्पर्धा बुधवार दि. 27 ते रविवार दि. 31 मे या कालावधीत अहिल्यानगर येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय, स्टेशन रोड येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांनी दिली.

या स्पर्धेत देशभरातील नामांकित बुद्धिबळपटू सहभागी होणार असून गुजरात, आंध्र प्रदेश, गोवा, तमिळनाडू, महाराष्ट्र आदी राज्यांतील दोनशेहून अधिक खेळाडूंनी आतापर्यंत आपला सहभाग निश्चित केला आहे. तसेच अनेक दिग्गज बुद्धिबळपटूही स्पर्धेत सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेचे उपाध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी यांनी दिली.

विशेष म्हणजे अवघ्या साडेपाच वर्षांच्या बाल बुद्धिबळपटूपासून ते 75 वषय ज्येष्ठ खेळाडूपर्यंत विविध वयोगटातील स्पर्धक या स्पर्धेत आपल्या बुद्धीचे कौशल्य पणाला लावणार असल्याचे सचिव यशवंत बापट यांनी सांगितले.या स्पर्धेचे प्रमुख आकर्षण ठरणार आहेत रशियन ग्रँड मास्टर पेट्र किरियाकोव. त्यांच्या सहभागामुळे स्पर्धेचा दर्जा अधिक उंचावला असून बुद्धिबळप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे ग्रँड मास्टर पेट्र किरियाकोव हे बुधवार दि. 27 मे रोजी सकाळी 9.30 वाजता लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय येथे एकाचवेळी 30 खेळाडूंविरुद्ध प्रदर्शनीय सामना सुद्धा खेळणार आहेत.

स्पर्धेचे उद्घाटन बुधवार दि. 27 मे रोजी सकाळी 11.30 वाजता होणार असून त्यानंतर स्पर्धेला प्रारंभ होईल. स्पर्धेत एकूण 9 फेऱ्या खेळविण्यात येणार आहेत. अंतिम बक्षीस वितरण समारंभ रविवार दि. 31 मे रोजी दुपारी 3 वाजता अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते होणार आहे.

स्पर्धेतील विविध गटांतील विजेत्यांना रोख पारितोषिके, आकर्षक 85 करंडके तसेच सर्व सहभागी खेळाडूंना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेचे प्रमुख पंच म्हणून प्रवीण ठाकरे (जळगाव) कार्यभार सांभाळणार असून त्यांना पवन राठी (पुणे) सहाय्यक पंच म्हणून सहकार्य करणार आहेत. त्यांच्यासोबत 6 सहाय्यक पंचांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्पर्धा जागतिक बुद्धिबळ महासंघाच्या नियमावलीनुसार पार पडणार आहे.
विशेष बाब म्हणजे या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे 100 लाकडी बुद्धिबळ पट आणि सोंगट्यांचा वापर महाराष्ट्रात प्रथमच करण्यात येणार आहे. अहमदनगर शहर व जिल्ह्यातील बुद्धिबळप्रेमी आणि खेळाडूंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

हे सुद्धा वाचा :  ‌‘नो पार्किंग‌’च्या नावाखाली दंडवसुलीचे रॅकेट?; खासगी ठेकेदाराला कारवाईचा अधिकार दिला कोणी?
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ