अहिल्यानगरात व्याख्यानमालेला उत्स्फूर्त प्रतिसाद
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
जगात सर्वत्र सुरु असलेल्या संघर्षांमुळे कुठल्याही क्षणी तिसर्या महायुद्धास सुरवात होईल अशी सध्याची परिस्थिती आहे. जगात अशा काही शक्ती आहेत त्या संकृतीच्या विध्वंस करण्यासच काम करत आहेत. अशा शक्तीपासून जगाला खरा धोका आहे. रक्तबिजा सारखी असलेली ही शक्ती कधीच संपलेली नाहीये. जवळजवळ प्रत्येक देशांमध्ये मार्सवाद सारख्या शक्तीने वेगवेगळे संघर्ष सुरु करून देशाच्या संस्कृतीवर घाला घातला आहे. देशाची संस्कृतीच पोखरल्या गेल्याने ती कोसळून पडत आहे. भारतासह विविध देशांमध्ये मार्सवादी डाव्या विचाराच्या वाळवीने मनावर प्रभाव टाकणार्या शिक्षण संस्था, प्रसिद्धी माध्यम, चित्रपट करमणूक, साहित्य, राजकीय पक्ष व कायदा व्यवस्था आदींना पोखरून मोठा धोका निर्माण केला आहे. त्यामुळे देशातील संस्कृती, कुटुंब व्यवस्था, धर्म देशप्रेम संपवण्याचे काम ते करत आहेत. या डाव्या विचाराच्या वाळवीचा धोका वेळीच ओळखला पाहिजे. हिंदू धर्माला व भारतला संपवण्याचे जे विध्वंसक षडयंत्र सुरु आहे त्यास ओळखा व जागरूक व्हा, असे आवाहन प्रसिद्ध लेखक अभिजित जोग यांनी केले.
विचार भारती आयोजित ग. म. मुळे स्मृती व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प प्रसिद्ध लेखक व वक्ते अभिजित जोग यांनी देशाला पोखरणारी वाळवी’ या विषयावर उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रमुख पाहुणे वेदांतचार्य देविदास म्हस्के महाराज, आमदार संग्राम जगताप, उद्योजक नंदन कामत, विचार भारतीचे अध्यक्ष अरुणराव कुलकर्णी, ज्येष्ठ मार्गदर्शक रवींद्र मुळे, सचिव सुधीर लांडगे आदींसह विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते. अभिजित जोग यांनी आपल्या व्याख्यानातून सांस्कृतिक मार्सवादाच्या षडयंत्राची माहिती देऊन जगातील संस्कृती, धर्म, देश यांना गिळण्यासाठी एक महाकाय यंत्रणा कार्यरत असल्याचे विविध उदाहरणांनी सांगितले. त्यांचे मुख्य लक्ष भारतातील कुटुंबव्यवस्था उध्वस्त करणे हे असून अमेरिकेत, युरोप मध्ये ते यशस्वी झाले आहेत.
नेपाळ, बांगलादेशमध्ये अस्थिरता निर्माण करून आता अल्टरनेट पॉलिटिस ही संकल्पना भारतात पेरत असल्याचे त्यांनी नमूद केले.भारत लवकरच जगाची महासत्ता होणार असून अर्थव्यवस्थाही उंचावत आहे. त्यादृष्टीने काही महत्वाचे निर्णय सरकारने घेतले असून लाबकच निकोबार आयलंड येथे ट्रान्सशिपमेंट पोर्ट करणार आहे. या ग्रेट निकोबार प्रोजेटद्वारे मलाकाची समुद्रधुनीवर गरुडा सारखी नजर भारत ठेवू शकतो. आता हा प्रोजेट होऊ नये यासाठी चीन, अमेरिका, डीप स्टेट सारख्या भारत विरोधी सर्व शक्ती आता एकवटत असून मोठ्याप्रमाणात याविरोधात मोहीम राबवली जाणार आहे.
मात्र हा महत्वाकांक्षी प्रोजेट भारत पूर्ण करून जगाला आपली शक्ती दाखवणार आहे.प्रास्ताविकात रवींद्र मुळे यांनी व्याख्यानमालेच्या आयोजनमागचा उद्देश विषद करून विचार भारतीच्य कार्याचा थोडयात आढावा घेतला. व्याख्यानमालेचे प्रमुख प्रशांत आढाव यांनी पाहुण्यांचा परिचय दिला. राजेंद्र पाचे, राहुल गांधी व गिरीश अग्रवाल यांनी पाहुण्यांचा सत्कार केला. डॉ.ऋषिकेश कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले तर श्रेयस लहामगे यांनी आभार मानले. यावेळी व्याख्यानमाला संयोजन समितीचे सदस्य उपस्थित होते.










