गुरु आणि शुक्राच्या संयोगाने ‘गजलक्ष्मी राजयोग’ तयार होत आहे. हा दुर्मिळ योग अनेक राशींसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे.
धनु : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील आणि काही धाडसी निर्णय घ्याल. शिक्षण क्षेत्रात लाभ मिळण्याची शक्यता आहे.
मेष : सरकारी कामात यश मिळून धनलाभ होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक क्षेत्रात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा होईल आणि नवीन संधी मिळतील.
वृषभ : मित्रांचा सहवास लाभेल. व्यापारी वर्ग नवीन कामात पैसे गुंतवू शकतील आणि भविष्यासाठी फायदेशीर योजना करतील.
मिथुन : कार्यक्षेत्र वाढणार आहे. अतिरिक्त खर्च आणि अति राग टाळण्याचा सल्ला दिला जातो.
कर्क : भागीदारी फायदेशीर ठरेल. महत्त्वाची वार्ता समजल्याने दैनंदिन कामे मार्गी लागतील.
सिंह : कामाच्या ठिकाणी मेहनतीचे कौतुक होईल. वाहन चालवताना किंवा रस्त्यावर जाताना पूर्ण काळजी घ्या.
कन्या : जुने रखडलेले काम पूर्ण होईल आणि धनस्थितीत सुधारणा होईल. प्रिय व्यक्तीची भेट आणि वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.
तूळ : कामात सावधगिरी बाळगा. वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता असल्याने खर्चावर नियंत्रण ठेवा.
वृश्चिक : मुलांचे प्रश्न मार्गी लागतील. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल.
मकर : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल आणि नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. विवाहाची शक्यता देखील निर्माण होऊ शकते.
कुंभ : जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करू शकाल आणि धनलाभाचे योग आहेत.
मीन : कौटुंबिक मतभेद दूर होऊन तुमची उत्साह आणि उमेद वाढेल. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे.










