- जाहिरात -spot_img
breaking news

महाराष्ट्र हादरला! साडेतीन वर्षांच्या मुलीच्या हत्येनंतर मुख्यमंत्री आक्रमक; पोलीस अधिक्षकांना दिले कडक आदेश

पुणे / नगर सह्याद्री :
पुण्यातील भोर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर ६५ वर्षांच्या नराधमाने बलात्कार करून तिची हत्या केली. ही घटना अत्यंत निंदनीय आणि क्लेशदायक असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या क्रूर कृत्यामुळे समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून त्याचे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे जुने संदर्भही समोर येत आहेत. या घटनेमुळे पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे असेही ते म्हणाले.

आरोपीला पोलिसांनी अटक केलीच आहे, मात्र आता हे संपूर्ण प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी आम्ही न्यायालयाला विशेष विनंती करणार आहोत. या नराधमाला कमीत कमी वेळात मृत्यूदंडाची शिक्षा मिळावी, हीच आमची न्यायालयाकडे आग्रही मागणी असेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विश्वास व्यक्त केला. या प्रकरणी कठोर कारवाईचे आदेश पुणे ग्रामीण अधिक्षकांना दिल्याचेही यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

या प्रकरानंतर विरोधकांकडून महाराष्ट्र आणि येथील महिला असुरक्षित असल्याचा आरोप केला जात आहे. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, प्रत्येक घटनेत राजकारण शोधणे यापेक्षा दुर्दैवी काहीही असू शकत नाही. काही बाबतीत संवेदनशीलता बाळगणे आवश्यक असते. विरोधक त्यांचे काम करतील, परंतु राज्य सरकार जे करणे आवश्यक आहे ते सर्व ठोस पावले नक्कीच उचलेल.

चिमुरडीच्या हत्येच्या निषेधार्थ आज नसरापूर कडकडीत बंद आहे. गावकऱ्यांनी ‘मुका मोर्चा’ काढला होता. प्रशासनाच्या आश्वासनानंतर गावकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. पण परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. गावकऱ्यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री सुमित्रा पवार यांची भेट घेणार आहे. नसरापूर अत्याचार प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेत पोलीस अधीक्षक संदीप गिल यांना कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर तपासाला वेग आला असून नराधमाला कठोर शिक्षा करण्याची गावकऱ्यांनी मागणी केली.

हे सुद्धा वाचा :  महागाईच्या संकटात जनतेला दिलासा द्या; खासदार लंके यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ