- जाहिरात -spot_img
breaking news

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याला पुण्यातून अटक, राजकीय वर्तुळात खळबळ

पुणे / नगर सह्याद्री –
वारकरी संप्रदायाबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या नेत्याला अटक करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे यांना पुण्यातील वाघोली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. वारकरी संप्रदायाबाबत विकास लवांडे यांनी वादग्रस्त विधान केले होते. याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांनी जामीनासाठी कोर्टात अर्ज दाखल केला होता. पण पुणे न्यायालयाने त्यांचा अंतरिम जामीन संरक्षणास मुदतवाढीचा अर्ज फेटाळला. त्यानंतर त्यांच्याविरोधात अटकेची कारवाई करण्यात आली आहे. खोट्या गुन्ह्यात अटक केल्याची प्रतिक्रिया विकास लवांडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. विकास लवांडे यांनी एक्सवर पोस्ट करत कारवाई केल्याची माहिती दिली आहे.

पुणे पोलिसांची चोर सोडून संन्याशाला फाशी असा संताप लवांडे यांनी व्यक्त केला आहे. माझ्यावर जीवघेणा हल्ला करणारे गुंड संग्राम भंडारे व इतर सर्व आरोपी मोकाट असून वाघोली पोलीस स्टेशनचे पोलिस एका खोट्या फिर्यादीवरून कसलाही पुरावा नसताना मला अटक करण्यासाठी मला फोन न करता रात्री घरी आले होते. पण मी घरी नव्हतो. कुटुंबीयांना माझ्या अटकेबाबत निरोप दिला. कुटुंबांना घाबरवण्याचा हा प्रयत्न होता काय ? असा माझा सवाल आहे ? असेही लवांडे म्हणाले.

पोलीस मला फोन करू शकले असते. मी फरार नाही किंवा माफीवीर नाही. शासनाने मला जरूर अटक करावी, मी पोलिसांना सहकार्य करणारा माणूस आहे. कारण मी कायदा पाळणारा माणूस आहे, कायदा हातात घेणारा माणूस नाही. सत्यासाठी लढत राहणार सत्याग्रही पद्धतीने जामीन , वकील ,दंड देणार नाही. पुणे पोलिसांनी मला जरूर अटक करावी मी तयार आहे, असे लवांडे म्हणाले.

हे सुद्धा वाचा :  ट्रकसह पूल कोसळला;
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ