- जाहिरात -spot_img
breaking news

15 वर्षीय अल्पवयीन गर्भवती, महिला पोलिसाला मारहाण, मुलीचे अपहरण; जुन्या वादातून हल्ला…

वारंवार अत्याचार, पोक्सोअंतर्गत गुन्हा
अहिल्यानगर | नगर सह्याद्री

नगर तालुक्यातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळगाव माळवी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 15 वषय अल्पवयीन मुलीवर कथितपणे वारंवार लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप असून, वैद्यकीय तपासणीत ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर एका संशयिताविरुद्ध पोक्सो कायद्यासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मे 2026 पासून आरोपीने अल्पवयीन मुलीला आपल्या घरी बोलावून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली. मुलीने नकार दिल्यानंतर तिला जीवे मारण्याची धमकी देत तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार अत्याचार करण्यात आला.
पीडितेला पोटदुखीचा त्रास होत असल्याने नातेवाईकांनी तिला एमआयडीसी येथील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथील वैद्यकीय तपासणीत गर्भवती असल्याचे समोर आल्यानंतर तक्रार दाखल करण्यात आली आहे. वसंत गहिनीनाथ चौधर (रा. आढाववाडी, पिंपळगाव माळवी ता.जि. अहिल्यानगर) असे आरोपीचे नाव आहे.

महिला पोलिसाला मारहाण, अंगठी पळवली
अहिल्यानगर: शहरातील पंचपीर चावडी परिसरात कर्तव्यावर असलेल्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करून एका अनोळखी चोरट्याने तिची सोन्याची अंगठी बळजबरीने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोतवाली पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या एका जुन्या गुन्ह्याचा पंचनामा करण्यासाठी फिर्यादी महिला पोलीस कर्मचारी या पंचपीर चावडी भागात गेल्या होत्या. त्या ठिकाणी तपास करत असताना अचानक एक अनोळखी व्यक्ती त्यांच्या दिशेने धावून आली. त्या व्यक्तीने काही समजण्याच्या आत महिला पोलिसाला मारहाण करण्यास सुरुवात केली. हाताच्या बोटातील सोन्याची अंगठी बळजबरीने काढून चोरटा घटनास्थळावरून पसार झाला. या घटनेनंतर पीडित महिला कर्मचाऱ्याने तातडीने कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडलेल्या प्रकाराबाबत तक्रार दिली.

जुन्या वादातून हल्ला
अहिल्यानगर : येथील संजयनगर काटवन खंडोबा भागात एका घरात साखरपुड्याची तयारी सुरू असताना जुन्या भांडणाच्या कारणावरून चार जणांनी मिळून एका कुटुंबावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत फिर्यादी तरुण आणि त्याचे आई-वडील गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पीडित तरुण रोहित गोपाळ वाघरी (वय 25) याने पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध फिर्याद दिली आहे. रोहित याच्या बहिणीचा साखरपुडा असल्याने घरासमोर मंडपाचे साहित्य उतरवत असताना अरविंद वसंत बुटीया, राजेश वसंत बुटीया, परवीन वसंत बुटिया आणि वसंत बुटीया (सर्व रा. महात्मा फुले वसाहत, संजयनगर) हे तेथे आले. त्यांनी जुन्या वादावरून शिवीगाळ करत राजेश याने लोखंडी गज आणि पक्कडने रोहितच्या पायावर व डोक्यात मारहाण केली. तसेच आई वडीलांनाही मारहाण केली. केस मागे घेतली नाही तर तुम्हा सर्वांना जिवंत मारून टाकू, अशी धमकीही दिली.

हे सुद्धा वाचा :  ब्लड बँक, कर्मचारी भरती, ब्लू लाईन प्रश्नांवर नगरसेवक आक्रमक, आज काय घडलं पहा

अल्पवयीन मुलीचे अपहरण; आरोपीच्या आवळल्या मुसक्या
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
पाथर्डी तालुक्यातील मोहरी येथून चार वर्षांपूव एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणाऱ्या खंडू गहीनाथ पालवे या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने ही धडक कारवाई केली. गेल्या चार वर्षांपासून बेपत्ता असलेल्या या मुलीचा शोध लावण्यात पोलिसांना मोठे यश आले असून, यामुळे परिसरात समाधान व्यक्त केले जात आहे.

14 सप्टेंबर 2022 रोजी आरोपी खंडू गहीनाथ पालवे (रा. मोहरी, ता. पाथर्डी) याने एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले होते. या प्रकरणी मुलीच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाथड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक पोलिसांना बऱ्याच दिवसांनंतरही मुलीचा आणि आरोपीचा शोध घेण्यात यश आले नव्हते. गुन्हा संवेदनशील असल्याने आणि मानवी तस्करीचा संशय आल्याने, या प्रकरणाचा तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडे सोपवण्यात आला होता.

या गुन्ह्यात मानवी तस्करीचे वाढीव कलमही लावण्यात आले होते.पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या पथकाने या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला. पोलिसांनी तांत्रिक माहिती गोळा करून आणि गुप्त बातमीदारांचे जाळे पसरवून आरोपीचा माग काढण्यास सुरुवात केली. अखेर पोलिसांच्या अथक प्रयत्नांना यश आले असून, 11 जुलै रोजी त्या मुलीचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले. पीडित मुलीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी पाथड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ही धडक कारवाई पोलीस निरीक्षक किरण शिंदे, शकील शेख, समीर सय्यद, अर्चना काळे आणि छाया रांधवन यांच्या पथकाने केली.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ