‘स्वच्छ शाळा सुंदर शाळा’ स्पर्धा व स्मृतिप्रीत्यर्थ उद्यान उभारण्याची मागणी / नगरसेवक निखिल वारे यांचे महापौर ज्योतीताई गाडे यांना निवेदन
अहिल्यानगर / नगर सह्याद्री :
स्वर्गीय आमदार अरुणकाका जगताप यांच्या जयंतीनिमित्त शहरात विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असताना, त्यांच्या स्मरणार्थ महानगरपालिकेमार्फत विविध उपक्रम राबविण्याची मागणी नगरसेवक निखिल वारे यांनी महापौर ज्योतीताई गाडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दि. २५ मार्च २०२६ रोजी स्व. अरुणकाका जगताप यांच्या जयंतीचे औचित्य साधून शहर व उपनगरांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. त्याच पार्श्वभूमीवर महानगरपालिकेनेही त्यांच्या कार्याचा गौरव राखण्यासाठी विशेष उपक्रम राबवावेत, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
स्व. अरुणकाका जगताप यांना स्वच्छतेची विशेष आवड होती. त्यामुळे महानगरपालिका हद्दीतील सर्व शाळांमध्ये “स्वच्छ शाळा सुंदर शाळा” हा उपक्रम राबविण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण होऊन शाळा व परिसर स्वच्छ राहण्यास मदत होईल. स्पर्धेचे आयोजन करून गुणवंत शाळांना रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देण्यात यावे. या उपक्रमासाठी आवश्यक खर्च सुजयदादा विखे पाटील मित्र मंडळ उचलण्यास तयार असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
स्व. अरुणकाका जगताप यांचे सामाजिक कार्य नगरकरांच्या कायम स्मरणात राहावे, यासाठी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या वाडिया पार्क चौकात त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.
या पुतळ्यामुळे त्यांच्या कार्याची आठवण पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचेल व नागरिकांना प्रेरणा मिळेल, असेही निवेदनात म्हटले आहे. महानगरपालिका हद्दीत स्व. अरुणकाका जगताप यांच्या स्मरणार्थ आधुनिक व सुसज्ज असे उद्यान विकसित करण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे. या उद्यानामध्ये हिरवाई, शांतता व निसर्ग सौंदर्य जपले जावे. फाऊंटन, कारंजे, विविध औषधी वनस्पतींची लागवड, ज्येष्ठ नागरिकांसाठी जॉगिंग ट्रॅक तसेच लहान मुलांसाठी अत्याधुनिक खेळणी बसविण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. स्व. अरुणकाका जगताप यांच्या जयंतीचे औचित्य साधून शहरात त्यांच्या कार्याची आठवण जपणारे आणि नागरिकांना प्रेरणा देणारे उपक्रम राबवावेत, अशी मागणी नगरसेवक निखिल वारे यांनी केली आहे.
यावेळी स्थायी समिती सभापती पैलवान सुभाष लोंढे, उपसभापती वर्षा सानप, नगरसेवक बाबुशेठ नागरगोजे, मनोज दुल्लम, रेवन्नाथ पवार, दत्त गाडळकर, अनिल धवन, जितू गंभीर, करण काळे, महेश लोंढे, सुजय मोहिते मोहित पंजाबी विशाल नाकाडे, आशा डागवले, सुनिता फुलसौंदर, गीतांजली काळे, संध्या पवार सुजाता पडोळे सुनीता कांबळे वर्षा काकडे सुनीता भिंगारदिवे मयुरी जाधव कमल भोसले अश्विनी लोंढे आशाताई कातोरे अनिता शेटीया रोशनी त्रिंबकेआशाताई कातोरे कमल कोतकर पोर्णिमा गव्हाळे शितल ढोणे सोनाबाई शिंदे मीना चोपडाआदींसह नगरसेवक उपस्थित होते.










