- जाहिरात -spot_img
breaking news

सोनईत ‘एलसीबी’ची वाळूतस्करी विरोधात कारवाई

१८ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त 

पाच वाळू तस्करांविरोधात गुन्हा दाखल

नेवासे/नगर सह्याद्री
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अवैध वाळू वाहतूक विरोधात सोनई पोलीस ठाण्याच्या हद्दीत धडक कारवाई करत अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या तीन वाहनांसह एकूण १८ लाख ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. एकूण पाच वाळू तस्करांविरोधात सोनई पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, हवालदार सोमनाथ झांबरे, बाळासाहेब ज्ञानदेव नागरगोजे, सुयोग सुपेकर, पोलीस कॉन्स्टेबल रोहीत येमुल असे पथकासह सोनई पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये खासगी वाहनाने गस्त घालत होते. सोनई ते गणेशवाडी रोडने गणेशवाडी शिवारात (ता. नेवासे) येथे चारचाकी वाहनातून चोरुन वाळू वाहतुक करत असल्याची माहिती मिळाली. गणेशवाडी शिवारात हॉटेल कैलास जवळ रात्री ११:५५ वाजेच्या सुमारास समोरुन एका मागे एक असे तीन वाहने येताना दिसले.

वाहने रत्यावर इशारे करून खात्रीसाठी अडवली असता गाडीचालक किरण बाबासाहेब सिसोदे (वय २५, रा खलालपिप्री, ता नेवासे), बोलोरो पिकअप चालक विवेक दत्तात्रय शिंदे (वय १९ रा. निपाणी निमगाव, ता नेवासे ) व पिकअप चालक बाळासाहेब पुंडलिक नळगे (वय ४२ रा. बहिरवाडी, ता नेवासे) असे वाहन,चालक यांची झडती घेतली असता त्यात प्रत्येकी एक ब्रास अवैध वाळूवाहतूक करतांना आढळून आले.

पोलीस हेड कॉन्स्टेबल सोमनाथ झांबरे यांच्या फिर्यादीवरून सोनई पोलिसांत वाहन चालक-मालक किरण बाबासाहेब सिसोदे , विवेक दत्तात्रय शिंदे, चालक आकाश तांबे (फरार) पुर्ण नाव माहीत नाही (रा. पानेगाव ता.नेवासे), मालक बाळासाहेब पुंडलिक नळगे (वय ४२ रा. बहिरवाडी ता.नेवासे), चालक मालक राजु सुपनर (रा.अंमळनेर ता.नेवासे (फरार) यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. एकूण १८.६० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा :  ‘संदीप उद्योग समूह’ची जागतिक स्तरावर वेगळी ओळख ; सिने अभिनेता सोनू सूद
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ