- जाहिरात -spot_img
breaking news

शासकीय यंत्रणा हतबल की मूकसंमती? शिक्षणाचा बट्ट्याबोळ …काय घडलं

डमी संस्कृती ठरतेय डोकेदुखी

श्रीगोंदा | नगर सह्याद्री
महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात सध्या डमी स्कूल, डमी कॉलेज संस्कृती वेगाने वाढताना दिसत असून, यामुळे पारंपरिक शिक्षण व्यवस्थेसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
अकरावी-बारावीच्या वर्गात केवळ नावापुरता प्रवेश घेऊन प्रत्यक्ष शिक्षण मात्र खासगी क्लासेसमध्ये घेण्याची पद्धत दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी शासनमान्य ज्युनिअर कॉलेजचे अस्तित्व धोक्यात आले असून, खासगी कोचिंग क्लासेसचे महत्त्व कमालीचे वाढले आहे.
NEET, JEE, CET यांसारख्या स्पर्धा परीक्षांच्या वाढत्या स्पर्धेमुळे खासगी क्लासेसनी शिक्षण क्षेत्रात मोठी बाजारपेठ निर्माण केली आहे. अनेक पालक आपल्या पाल्याला आयआयटी किंवा मेडिकल क्षेत्रात प्रवेश मिळावा, या उद्देशाने लाखो रुपयांची फी भरून या पद्धतीला अप्रत्यक्ष संमती देताना दिसत आहेत. काही ठिकाणी नामांकित कॉलेज आणि खासगी क्लासेस यांच्यात छुपी हातमिळवणी होत असल्याचीही चर्चा शिक्षण वर्तुळात रंगत आहे.

या डमी संस्कृतीचे काही फायदे पालक आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीने मान्य केले जात असले, तरी त्याचे दूरगामी तोटे अधिक गंभीर मानले जात आहेत. खासगी क्लासेसमध्ये फक्त परीक्षाभिमुख शिक्षण दिले जात असल्याने विद्यार्थ्यांना गुणांच्या स्पर्धेत फायदा होत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. तसेच कॉलेज आणि क्लासेस यामधील प्रवास व वेळेची ओढाताणही कमी होत असल्याचे दिसून येते.
मात्र, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्टीने या पद्धतीचे परिणाम चिंताजनक आहेत. विद्याथ मैदान, मित्रपरिवार, सांस्कृतिक उपक्रम आणि प्रत्यक्ष शालेय वातावरणापासून दूर जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सामाजिक आणि मानसिक विकासावर विपरीत परिणाम होण्याची भीती शिक्षणतज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

दरम्यान, शासनाने या डमी संस्कृतीवर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिल्यास हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ऐन परीक्षेच्या तोंडावर नियमांवर बोट ठेवून कारवाई झाल्यास विद्यार्थ्यांचे संपूर्ण वर्ष वाया जाण्याची भीती पालकांकडून व्यक्त होत आहे. चूक व्यवस्थेची आणि शिक्षा विद्यार्थ्यांना का? असा संतप्त सवाल पालक उपस्थित करत आहेत.
या वाढत्या प्रकारामुळे शिक्षण क्षेत्रातील मूलभूत मूल्ये धोक्यात आली असून, शासन, शिक्षण संस्था, खासगी क्लासेस आणि पालक यांनी एकत्रितपणे यावर तोडगा काढण्याची गरज निर्माण झाली आहे.

हे सुद्धा वाचा :  सुजित झावरे विधान परिषद निवडणुकीसाठी थेट मैदानात... कोणाला दिले आव्हान
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ