- जाहिरात -spot_img
breaking news

दिव्यांगांचे खोटे प्रमाणपत्र भोवले, झेडपी सिईओ यांनी केली ही कारवाई

झेडपीचे १५ बनावट अपंग कर्मचारी निलंबित | आठ जणांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश
अहिल्यानगर | नगर सह्याद्री

जिल्हा सरकारी रुग्णालयाने केलेल्या पडताळणीत अपंगत्वाचे प्रमाण ४० टक्क्यांपेक्षा कमी आढळलेल्या जिल्हा परिषदेच्या १५ कर्मचार्‍यांवर मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. यामध्ये ११ शिक्षक, ३ शिपाई (परिचर) व १ आरोग्य सेवकाचा समावेश आहे. यातील ८ जणांवर गुन्हे दाखल करण्याचा आदेशही त्यांनी संबंधित गटविकास अधिकार्‍यांना त्यांनी दिले आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात अपंगत्वाच्या बनावट प्रमाणपत्राच्या आधारे नोकर्‍या मिळवण्याचे विविध विभागातील प्रकरणे गाजत आहेत. याच साखळीतील जिल्हा परिषद कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. इतर विभाग कोणती भूमिका घेतात याकडे  सरकारी कर्मचार्‍यांचे लक्ष लागले आहे. काही वर्षांपूर्वी अपंगत्वाच्या बनावट प्रमाणपत्राचा आधारे बदली अथवा सरकारी सवलतींचा गैरफायदा घेणार्‍या तब्बल ७८ प्राथमिक शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. हे प्रकरण अद्यापि न्यायालयीन प्रक्रियेत आहे. आता आणखी १५ कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

राज्य सरकारने सर्व सरकारी विभागातील अपंग कर्मचार्‍यांच्या वैद्यकीय पडताळणीचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेने तालुकानिहाय शिबिरे घेऊन अपंग कर्मचार्‍यांची वैद्यकीय पडताळणी केली. जिल्हा परिषदेमध्ये एकूण ५४५ विविध प्रकारचे अपंग कर्मचारी आहेत. त्यामध्ये सकृतदर्शनी १८० कर्मचारी अपंग असल्याचे आढळले. उर्वरित कर्मचार्‍यांची पडताळणी जिल्हा सरकारी रुग्णालयामार्फत करण्यात आली. त्यामध्ये १८ कर्मचार्‍यांचे अपंगत्व प्रमाणपत्र ४० टक्क्यापेक्षा कमी आढळले. तसा अहवाल जिल्हा रुग्णालयाच्या जिल्हा शल्य चिकित्सकांनी जिल्हा परिषदेला पाठवला. १९ कर्मचारी वैद्यकीय पडताळणीसाठी गैरहजर राहिले होते.

अशा सर्व कर्मचार्‍यांना मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी नोटीस पाठवून खुलासा मागवला होता. यातील १५ जणांचा खुलासा समाधानकारक नसल्याने त्यांच्यावर निलंबनाच्या कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. यातील एकाचा खुलासा मान्य करण्यात आला आहे तर एकाची पुन्हा पडताळणी करण्यात आले आहे. एका खुलाशाची पुन्हा पडताळणी केली जाणार आहे. याशिवाय पडताळणीसाठी गैरहजर राहिलेल्या १९ कर्मचार्‍यांची अपंग विभागाच्या उपसंचालक कार्यालयामार्फत पडताळणी केली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हे सुद्धा वाचा :  सात्रळमध्ये व्यापार्‍याला अडवून मारहाण; जबरदस्तीने पैसे उकळणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात

५९ जणांचा निकाल बाकी
जिल्हा परिषद प्रशासनाने केलेल्या तपासणीत पहिल्या टप्प्यात १८ जणांच्या प्रमाणपत्रावर शंका उपस्थित झाली होती. यातील १५ दोषी आढळले असून एकाचा खुलासा मान्य करण्यात आला असून दोघांची पुन्हा पडताळणी करण्यात येणार आहे. यासह नाशिक आरोग्य उपसंचालक कार्यालयात तपासणी पाठवलेल्या ४१ प्रमाणपत्रासह नगरच्या जिल्हा रूग्णालयातील तपासणीला गैरहजर असणार्‍या १८ जणांना पुन्हा तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे. यामुळे अद्याप ५९ जणांचा निकाल लागणे बाकी असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले.

निलंबन कारवाई झालेले कर्मचारी
१)समाधान कचरू घुगे (आरोग्य सेवक, कर्णबधिर, कायदेशीर कारवाई), २) सुनील दत्तात्रय वाघ (मुख्याध्यापक, कर्णबधिर), ३) प्रभाकर संतु चोखंडे (परिचर, अस्थिभंग), ४) दत्तात्रय आनंदराव फपाळे (मुख्याध्यापक, कर्णबधिर), ५) वामन जगन्नाथ घाटपांडे (परिचर अस्थिव्यंग, कायदेशीर कारवाई), ६) अतुल तुकाराम सातपुते (परिचर, अस्थिव्यंग), ७) मंदा तुकाराम शिंदे (शिक्षक, कर्णबधिर, कायदेशीर कारवाई), ८) संगीता विजय कदम (शिक्षक, अस्थिभंग), ९) संजयकुमार विश्वनाथ बडे (शिक्षक, अस्थिभंग), १०) वर्षा त्र्यंबक अकोलकर (शिक्षक, कर्णबधिर, कायदेशीर कारवाई), ११) पुष्पलता दिनकर खेडकर (शिक्षक, कर्णबधिर, कायदेशीर कारवाई), १२) सतीश मोहन लगड (शिक्षक, अस्थिव्यंग), १३) सागर रेवजी मोरे (शिक्षक, कर्णबधिर, कायदेशीर कारवाई), १४) विनायककुमार मगन वाडेकर (शिक्षक, अल्पदृष्टी, कायदेशीर कारवाई) व १५) संतोष हिरामण लष्करे (शिक्षक, कर्णबधिर, कायदेशीर कारवाई)

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ